Posted On:
23 NOV 2026 3:19PM by PIB Mumbai
नागपूर, 23 नोव्हेंबर 2026
भावी एनसीसी अधिकाऱ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए), कामठी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (आरटीएमएनयू), नागपूर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एनसीसी ओटीए, कामठी येथे नियुक्ती-पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा आयोजित करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूर येथे एनसीसी ओटीए, कामठीचे कमांडंट मेजर जनरल सरबजित सिंग बक्षी (सेना पदक, विशिष्ट सेवा पदक) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व क्षमता, संभाषण कौशल्य आणि एकूणच व्यावसायिक विकास वाढवण्यासाठी सुयोग्य संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या सहकार्यामुळे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी एनसीसी ओटीएचे प्रशिक्षण कौशल्य आणि आरटीएमएनयूचा शैक्षणिक अनुभव यांचे एकीकरण होणार आहे. भविष्यातील जबाबदाऱ्या निष्ठेने आणि उत्कृष्ट पद्धतीने पेलण्यासाठी सज्ज असलेले आत्मविश्वासू, सक्षम आणि प्रेरणादायी नेते घडवण्याच्या दिशेने हा संयुक्त उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

_20261123134146_bea3c3.jpeg)

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai