57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

पडद्यामागील क्षणचित्रे: 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची झलक

Posted On: 21 NOV 2026 10:38PMby PIB MumbaiRelease ID: 2340051Views: 5
Read in:

गोवा, 21 नोव्‍हेंबर 2026

 

57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज (21 नोव्हेंबर 2026) गोव्यात चित्रपटविषयक विविध उपक्रमांचे रंगवेधी कार्यक्रम झाले. चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद, पत्रकार परिषदा, चित्रपट प्रदर्शन, रेड-कार्पेटवरील उपस्थिती आणि सांस्कृतिक सोहळा अशा रंगीबेरंगी कार्यक्रमांची रेलचेल आज होती. या कार्यक्रमांमध्ये चित्रपट निर्माते, अभिनेते, परीक्षक मंडळाचे सदस्य, चित्रपट समीक्षक आणि चित्रपटप्रेमी एकत्र आले होते. यावेळी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथाकथनातील विविधतेचा उत्सव साजरा झाला.

कला अकादमीमध्ये समांतर चित्रपट आणि माहितीपट निर्मितीवर झालेल्या विचारप्रवर्तक संवादांपासून ते 'इंडियन पॅनोरमा', 'आंतरराष्ट्रीय चित्रपट विभाग', 'गोवा विभाग' आणि 'गाला प्रीमियर' अंतर्गत विविध चित्रपटांचे प्रदर्शन आणि प्रीमियरपर्यंत, विविध उपक्रमांनी सर्जनशील विचाऱ्याची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. दिवसभरात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांशी संबंधित चित्रपट निर्माते आणि कलाकारांची रेड-कार्पेटवर उपस्थिती होती. तसेच माध्यमांशी झालेल्या संवादातून त्यांनी आपल्या सर्जनशील प्रवासाची आणि चित्रपट निर्मितीविषयक दृष्टिकोन सर्वांसमोर मांडले. 

या दिवसाच्या कार्यक्रमात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) 2026 चा उद्घाटन सोहळा, इंडियन पॅनोरमा आणि इंडियन पॅनोरमा 2026 च्या ज्युरींचा सत्कार समारंभ यांचाही समावेश होता.

कला अकादमीमध्ये चित्रपटविषयक संवाद

गोव्यातील 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (इफ्फी) कला अकादमीमध्ये 21 नोव्हेंबर 2026 रोजी “समांतर सिनेमाचे नैतिक विश्व: गिरीश कासरवल्ली यांची 50 वर्षे” या विषयावरील एका चर्चासत्रात चित्रपटप्रेमी आणि चित्रपट रसिकांनी हजेरी लावली.

 

माहितीपट आणि सामाजिक जबाबदारी

गोव्यातील इफ्फी 2026 दरम्यान 21 नोव्हेंबर 2026 रोजी “साक्षीदारापासून परिवर्तनापर्यंत: माहितीपटांची सामाजिक जबाबदारी” या चर्चासत्रात माहितीपट निर्मितीच्या माध्यमातून समाजाशी आणि समकालीन प्रश्नांची संवाद साधण्याचे भूमिकेचा शोध घेण्यात आला.  

 

क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) 2026 उद्घाटन सोहळा

57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून सीएमओटी 2026 चा उद्घाटन सोहळा गोव्यातील कला अकादमीमध्ये 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोहळा पार पडला.

 

इंडियन पॅनोरमा 2026

21 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी येथील आयनॉक्समध्ये पार पडलेला 'इंडियन पॅनोरमा 2026' चा उद्घाटन सोहळा आणि परीक्षक सत्कार समारंभ हे या महोत्सवाचे एक महत्त्वाचे आकर्षण ठरले.

 

चित्रपट निर्मात्यांचा माध्यमांशी संवाद 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात - इफ्फी मध्ये  21 नोव्हेंबर 2026 रोजी वर्ल्ड प्रीमियर म्हणून सादर झालेल्या 'लुकिंग फॉर मायकेल' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान दिग्दर्शिका हुआना मासिआस आणि अभिनेत्री लोरेना लोपेझ मार्टिनेझ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी - IFFI), 21 नोव्हेंबर 2026 रोजी इंडियन पॅनोरमा विभागातील सलामीचा कथाबाह्य (नॉन फिचर) चित्रपट  असलेल्या 'बिकमिंग' च्या पत्रकार परिषदेदरम्यान दिग्दर्शिका लीना यादव आणि निर्माते असीम बजाज यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 

21 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी - IFFI), 'इंडियन पॅनोरमा 2026' च्या कथाबाह्य चित्रपट (Non-Feature Film) परीक्षक मंडळाचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ आणि इतर परीक्षक सदस्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित केले.

 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी), 21 नोव्हेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सिनेमा विभागातील सलामीचा चित्रपट असलेल्या 'फादरलँड'  च्या पत्रकार परिषदेदरम्यान निर्मात्या इवा पुश्चिन्स्का यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी), 21 नोव्हेंबर 2026 रोजी इंडियन पॅनोरमा विभागातील सलामीचा कथापट 'धुरंधर' च्या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेते राकेश बेदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (इफ्फी), 21 नोव्हेंबर 2026 रोजी इंडियन पॅनोरमाच्या कथापट विभागाच्या परिक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

महोत्सवातील काही खास क्षण

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ठिकाणी, 21 नोव्हेंबर 2026 रोजी उपस्थितांमधील हास्यविनोद आणि संवादाचा एक सहजसुंदर क्षण.

 

21 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) गजबजलेल्या आणि उत्साही वातावरणात, थोडा विसावा घेत गप्पांमध्ये रंगलेले रसिक.

 

रेड कार्पेटवरील जल्लोष

इफ्फी 2026 च्या रेड कार्पेटवर चित्रपट निर्मात्यांनी दिमाखदार हजेरी लावली, ज्याला उत्साही चाहत्यांकडून भरभरून दाद आणि टाळ्यांचा कडकडाट मिळाला!

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340051
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026