Posted On:
20 NOV 2026 6:29PM by PIB Mumbai
मुंबई, 20 नोव्हेंबर 2026
लेखापरीक्षण आणि लेखा विभागाच्या मुंबई कार्यालयांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 'प्रादेशिक क्षमता विकास व ज्ञान संस्था' येथे लेखापरीक्षण सप्ताह 2026 साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

आस्था लुथरा, पीडीए (सेन्ट्रल), विजय कोठारी, डीजी (एफएस) संदीप लाल, डीजी (डब्ल्यू.आर), तनुजा मित्तल; डीजी (आरसीबी&केआय), मुंबई, डी जयशंकर, पीएजी (ऑडिट)-I, मुंबई
लेखापरीक्षण दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, मुंबई येथील आरसीबी अँड केआय च्या महासंचालक, तनुजा मित्तल यांनी सांगितले की, दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी 'ऑडिट दिवस' अर्थात लेखापरीक्षण दिवस साजरा केला जातो, कारण 16 नोव्हेंबर 1860 रोजी सर एडवर्ड ड्रमंड यांनी पहिले 'ऑडिटर जनरल' म्हणून पदभार स्वीकारला होता. गेली 166 वर्ष, विभाग सतत विकसित होत आहे आणि बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत आहे. गेल्या दोन वर्षांत विभागीय अडथळे दूर करणे, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता यासारख्या संकल्पनांचे ऑडिट करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि ऑडिटसाठी विशिष्ट एआय (AI) विकसित करणे यासारख्या सुधारणा करण्यात आल्या.
संदीप लाल, महासंचालक (पश्चिम विभाग) आणि तनुजा मित्तल, महासंचालक, आरसीबी अँड केआय यांनी 'कॅग-आयसीएसएसआर' (CAG–ICSSR) संशोधन लेख स्पर्धेतील महाराष्ट्र विभागातील सहा विजेत्यांचा सन्मान केला. सार्वजनिक उत्तरदायित्व, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय उपक्रम राबवण्यात आला होता.

'कॅग-आयसीएसएसआर' संशोधन लेख स्पर्धेचे विजेते
मुख्य अतिथी विरेंद्र सिंह, सचिव, आयएएस यांचे तनुजा मित्तल, महासंचालक, आणि विजय कोठारी, संचालक जनरल यांनी एक रोपटे आणि स्मृतीचिन्ह देऊन स्नेहमय स्वागत केले.

आरसीबी अँड केआय , मुंबईच्या महासंचालक, तनुजा मित्तल, प्रमुख पाहुणे वीरेंद्र सिंह (आयएएस) यांचे स्वागत करत आहेत
“प्रशासनातील एआय: अधिक स्मार्ट प्रणाली, अधिक मजबूत उत्तरदायित्व”, या विषयावरील आपल्या विशेष भाषणात वीरेंद्र सिंह म्हणाले की, ऑडिट आणि एआय एकच प्रश्न विचारतात: लाभ योग्य नागरिकापर्यंत पोहोचला का? त्यांनी महाराष्ट्राच्या 'आय-गव्हर्नन्स' (iGovernance) कडील वाटचालीचा आढावा घेतला आणि 'महाराष्ट्र एआय धोरण 2026–31', अधिकाऱ्यांसाठी 'महा इंडस एआय' (Maha Indus AI) वर्कस्पेस, तसेच राज्याची स्वतःची 'महा-एआय' (MahaAI) प्रणाली याविषयी माहिती दिली.
मुंबईतील लेखापरीक्षण आणि लेखा विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या चार नवकल्पना सादर केल्या: 'SAI SAAR' - 15 वर्षांहून अधिक काळातील ऑडिट अभिलेखांमधून माहिती शोधण्यासाठीचे 'सिमँटिक सर्च' प्लॅटफॉर्म, 'क्वार्टरली ऑडिट प्रोग्राम जनरेटर' - जो ऑडिट नियोजनासाठी लागणारा वेळ 40 तासांहून अधिक कालावधीवरून कमी करून एका तासापेक्षा कमी करतो, 'ML-CaRT' - प्राप्तिकर छाननी प्रकरणांना जोखमीच्या तीव्रतेनुसार श्रेणीबद्ध करण्यासाठी 'मशीन लर्निंग'वर आधारित साधन, आणि कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी 'DAK मॅनेजमेंट' वेब ॲप्लिकेशन.
पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai