दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभाग 4 डिसेंबर 2026 रोजी प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन करणार

Posted On: 20 NOV 2026 4:10PM by PIB Mumbai

पणजी, 20 नोव्हेंबर 2026

टपाल विभाग 4 डिसेंबर 2026 रोजी पणजीतील गोवा विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल यांच्या कार्यालयात प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन करत आहे. गोवा विभागातील ग्राहक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत टपाल सेवेसंबंधीच्या आपल्या तक्रारी आणि गाऱ्हाणी सादर करू शकतात.

टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरचे पैसे न मिळणे यासंबंधीच्या तक्रारी/गाऱ्हाणी, मूळ तक्रार सादर केल्यापासून 6 आठवड्यांच्या आत निकाली निघाल्या नाहीत, अशा तक्रारी डाक अदालतीत स्वीकारल्या जातील.

विचारार्थ सादर करण्यात येणाऱ्या तक्रारींसोबत संबंधित तपशील देणे आवश्यक आहे. यामध्ये तक्रार सादर केल्याच्या तारखा तसेच मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली होती, त्यांची नावे आणि पदनाम यांचा समावेश असावा.

ग्राहकांनी आपल्या तक्रारींच्या दोन प्रती :

सहायक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा विभाग, पणजी – 403001

या पत्त्यावर पाठवाव्यात.

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2339096) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English