Posted On:
19 NOV 2026 8:14PM by PIB Mumbai
मुंबई, 19 नोव्हेंबर 2026
भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील डीजीटीएस अर्थात करदाता सेवा महासंचालनालयाने एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. महासंचालनालयाने संविधान दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या विशेष उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या नेतृत्त्वाखालील सर्वात मोठ्या ‘हायब्रिड’ उपक्रमाच्या माध्यमातून संविधान आणि अप्रत्यक्ष करासंदर्भात केलेल्या व्यापक जनजागृतीची लंडन येथील वर्ल्ड बँक ऑफ रेकॉर्डसकडून जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.
हा कार्यक्रम डीजीटीएस अहमदाबाद क्षेत्रीय युनिट आणि मुंबई क्षेत्रीय युनिट यांच्या संयुक्त सहकार्याने गेल्यावर्षी - 26 नोव्हेंबर 2025 रोजी ‘दस्तऐवजाच्या पलीकडे: संविधानातील मूल्यांचे प्रत्यक्ष आचरण’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत देशातील सुमारे 750 हून अधिक ठिकाणी भारतीय संविधान, वस्तू आणि सेवा कर आणि सीमाशुल्क यासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये सुमारे एक लाख जणांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, सर्व सहभागींनी एका सामायिक व्यासपीठाच्या माध्यमातून आपापल्या ठिकाणी उपस्थित राहून ठीक सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी एकत्रितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या जागतिक सन्मानाची अधिकृत घोषणा लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे 13 नोव्हेंबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्राद्वारे करण्यात आली.
या कामगिरीतून जनसंपर्क आणि करदात्यांमधील जनजागृतीविषयक महत्त्वपूर्ण उपक्रमाचे दर्शन घडते आणि शासनाच्या नेतृत्त्वाखालील समन्वित हायब्रिड कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील मोठ्या आणि विविध लोकांशी जोडले जाण्याची क्षमता दिसून येते. या कार्यक्रमात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव यांच्यासह देशातल्या विविध ठिकाणांहून विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक वर्ग, शासकीय अधिकारी, कर विभागाचे अधिकारी व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त सहभाग घेतला . यावरुन या कार्यक्रमामागील संस्थात्मक पातळीवरील एका व्यापक जनसंपर्क कार्यक्रमातील सहकार्याची भावना दिसून येते. या उपक्रमाद्वारे संविधानविषयक जागरूकता आणि अप्रत्यक्ष कर या दोन्हींची सांगड घालून संविधानात्मक मूल्यांविषयीचे आपले ज्ञान आणि समज अधिक सखोल करणे, नागरिकांची कर्तव्ये, राष्ट्र उभारणीच्या कार्यातील करांचे योगदान आणि जागरूक आणि सुजाण करदात्यांचा समाज घडवण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी डीजीटीएसच्या अहमदाबाद क्षेत्रीय युनिटचा कार्यभार सांभाळणारे मुंबई क्षेत्रीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार — यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाची संकल्पना मांडण्यात, मार्गदर्शन करण्यात आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सुमित कुमार यांनी आपले नेतृत्त्व आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून अहमदाबाद क्षेत्रीय युनिटचे सहसंचालक (आय आर एस ) चंचल तिवारी यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे केंद्रीय स्तरावर आयोजन केले आणि त्या अंतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. विविध संबंधित घटकांना एकत्र आणण्यात आणि इतक्या अभूतपूर्व स्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. या योगदानातून अप्रत्यक्ष कर आणि घटनात्मक मूल्यांच्या संदर्भात नवोन्मेषी जनसंपर्क, जनजागृती आणि माहितीच्या प्रभावी प्रसाराप्रती डीजीटीएसची वचनबद्धता दिसून येते.



लंडनच्या विश्व विक्रम नोंदपुस्तिकेद्वारे मिळालेली ही मान्यता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि जकात (सी बी आय सी) अंतर्गत कार्यरत असलेल्या करदाता सेवा महासंचालनालयासाठी (डी जी टी एस) अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. ही कामगिरी डी जी टी एस चे अधिकारी, कर्मचारी आणि देशभरातील सहभागी घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, ज्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरील उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. हे यश नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि जनजगृती निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरले असून एकत्रित प्रयत्न, नाविन्यपूर्ण संवाद आणि तंत्रज्ञानावर आधारित व्याप्ती याद्वारे उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होते.
ही मान्यता डी जी टी एस ला त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थी, करदाते, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, व्यावसायिक संस्था तसेच इतर संबंधित घटकांसोबतचा संवाद अधिक दृढ करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे. एक समन्वित देशव्यापी व्यासपीठ कशा प्रकारे घटनात्मक जाणीव आणि करदात्यांचे शिक्षण यांचा प्रभावी मेळ घालू शकते हे या उपक्रमाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. याद्वारे नागरिकांच्या हक्कांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल अधिक जागरूकता निर्माण होते, तसेच माहितीपूर्ण आणि स्वेच्छेने नियमांचे पालन करण्याची संस्कृती अंगवळणी पडण्यास मदत होते.
या मान्यतेमुळे करदाता सेवा महासंचालनालयाची करदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, सहयोगात्मक जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी आणि संबंधित घटकांशी संवाद साधण्यासाठी असलेली निरंतर कटिबद्धता प्रतिबिंबित होते. डी जी टी एस च्या मुंबई विभागीय युनिटने (एम झेड यू) सातत्यपूर्ण व्याप्ती उपक्रम, करदात्यांचे शिक्षण, संबंधित घटकांशी संवाद आणि तक्रार निवारण यांसारख्या कार्यांद्वारे डी जी टी एस चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, मुंबई विभागीय युनिटने व्यापक 62 कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आणि त्याचवेळी तक्रारींचे ताबडतोब आणि प्रभावी निवारण सुनिश्चित केले. आर्थिक वर्ष 2026-27 मध्येही हे प्रयत्न सुरू ठेवत, डी जी टी एस च्या मुंबई विभागीय युनिटने एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 85 व्यापक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये 48 सेमिनार/वेबिनार/हायब्रिड कार्यक्रम आणि 37 परस्पर संवादी सत्रांचा समावेश आहे.
घटनात्मक सजगता वृद्धिंगत करण्याच्या आपल्या निरंतर वचनबद्धतेचा भाग म्हणून, डी जी टी एस चे मुंबई विभागीय युनिट गुरुवार, दि 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून संविधान दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. "संविधान दिन, 2026 : घटनात्मक मूल्ये, संविधानवाद आणि पुढील वाटचाल" ही या कार्यक्रमाची संकल्पनाआहे. केरळ उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती मनू एस. नायर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, सीबीआयसीचे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, करदाते, व्यापार संस्था, व्यावसायिक संस्था आणि इतर संबंधित घटकांचा सहभाग अपेक्षित आहे. करविषयक कायदे आणि कार्यपद्धतींबाबत जागरूकता वाढवण्यात, स्वेच्छेने कर नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यात, संबंधित घटकांशी संवाद अधिक दृढ करण्यात आणि करदात्यांचा एक सुजाण समुदाय घडवण्यात या उपक्रमांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
स्रोत: करदाता सेवा महासंचालनालय, मुंबई क्षेत्रीय युनिट / पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /भक्ती सोनटक्के/संदेश नाईक/प्रिती मालंडकर