Posted On:
18 NOV 2026 4:25PM by PIB Mumbai
गोवा, 18 नोव्हेंबर 2026
भारत सरकारचा टपाल विभाग स्वातंत्र्यानंतर जारी करण्यात आलेल्या स्मरणार्थ टपाल तिकिटांवर आधारित ‘युवा भारत फिला क्विझ 2026’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करत आहे. टपाल तिकिटांच्या अभ्यासाच्या माध्यमातून तरुणांमध्ये भारताचा समृद्ध इतिहास, वारसा, संस्कृती आणि देशाच्या कामगिरीविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
1 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 25 वर्षे वय असलेल्या युवांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रत्येकी 2 सदस्यांच्या संघांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
प्रादेशिक स्तरावरील प्राथमिक लेखी परीक्षा आणि प्रश्नमंजुषा 23 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजता गोव्यातील पणजी येथील पाटो परिसरातील डब्ल्यूसीटीसी, टपाल भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.
प्राथमिक परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 40 प्रश्न असतील. हे प्रश्न सोडवण्यासाठी सहभागी स्पर्धकांना 25 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
उत्तर गोवा विभागाच्या टपाल कार्यालयांचे वरिष्ठ अधीक्षक यांनी पात्र तरुणांना या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जाणून घेण्याची व त्यांचा शोध घेण्याची ही संधी तरुणांनी साधावी, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या स्मरणार्थ टपाल तिकिटांविषयी तरुणांमध्ये आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशातील ऐतिहासिक घटना, सांस्कृतिक विविधता आणि उल्लेखनीय कामगिरी यांचे मोलाचे प्रतिबिंब या टपाल तिकिटांमध्ये उमटलेले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा :
https://drive.google.com/file/d/1ztBNaxoBg7Tq2B6CTcgJr69IJxPKtSOQ/view?usp=drive_link

***
Shailesh Patil / Gajendra Deora / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai