भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटीएम'ने साजरा केला 65 वा स्थापना दिन; हवामान आणि जलवायु संशोधनातील प्रमुख प्रगती केली अधोरेखित

Posted On: 17 NOV 2026 8:30PM by PIB Mumbai

पुणे स्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने  (आयआयटीएम),  'मेघदूत' सभागृहात आपला 65 वा स्थापना दिन साजरा केला. हवामान अंदाज, हवामान संशोधन आणि वातावरणीय विज्ञान क्षेत्रातील संस्थेच्या सहा दशकांहून अधिक काळातील योगदानाचे हे प्रतीक आहे.

या समारंभाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या 'अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन' (ANRF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवकुमार कल्याणरामन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज (NIAS) चे संचालक, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे  माजी सचिव आणि आयआयटीएमच्या संशोधन सल्लागार समितीचे  अध्यक्ष डॉ. शैलेश नायक हे विशेष  अतिथी म्हणून उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे  सचिव डॉ. श्रीनिवास कुमार तुम्मला यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपले विचार मांडले. आपल्या संदेशात त्यांनी आयआयटीएमच्या 65 व्या स्थापना दिन समारंभात  सहभागी होत असल्याबद्दल  आनंद व्यक्त केला आणि 1962  पासून हवामान अंदाज, हवामान विज्ञान, वातावरणीय संशोधन आणि पृथ्वी प्रणाली विज्ञान  या क्षेत्रांत भारताची क्षमता वाढवण्यासाठी संस्थेने दिलेले महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले.

संस्थेची कामगिरी आणि भविष्यातील रूपरेषा  सादर करताना, आयआयटीएम चे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव यांनी अनेक महत्त्वाचे टप्पे अधोरेखित केले:

·विक्रमी संशोधन कामगिरी : गेल्या वर्षभरात  302 शोधनिबंध प्रकाशित

·प्रगत हवामान मॉडेलिंग: आंतरराष्ट्रीय 'सीएमआयपी7' (CMIP7) कार्यक्रमांतर्गत हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी, आयआयटीएमचे  पुढच्या पिढीतील 'अर्थ सिस्टम मॉडेल' (IITM-ESM v3) विकसित केले.

विस्तारित निरीक्षणे: मालदीवमधील हवामान वेधशाळेसह भारताच्या हवामान निरीक्षण जाळ्याचे बळकटीकरण.

·संशोधन पायाभूत सुविधा: सुमारे  3  पेटाबाइट्स  इतक्या हवामान आणि जलवायुविषयक डेटाचा साठा  तयार करणे.

·नवोन्मेष आणि उद्योजकता: हवामान आणि जलवायुविषयक उपक्रमांसाठी  एक समर्पित इनक्युबेशन केंद्र स्थापन करणे.

वैज्ञानिक क्षमता निर्मिती : 93 पीएचडी अभ्यासकांना सहाय्य आणि प्रगत संशोधन क्षमतांचा सातत्यपूर्ण  विकास.

भविष्याचा विचार करून आयआयटीएम एआय/एमएल-आधारित हवामान आणि वातावरण अंदाज, उपग्रह हवामानशास्त्र आणि दीर्घकालीन हवामान निरीक्षणासाठी भारत हवामान निरीक्षण नेटवर्कवर लक्ष केंद्रित करत आहे, असे ते म्हणाले .

एएनआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. शिवकुमार कल्याणरामन यांनी महत्वपूर्ण डेटासेट आणि मॉडेल्स विकसित करण्यातील आयआयटीएमच्या योगदानाची प्रशंसा केली  आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्याची  त्यांची प्रचंड क्षमता अधोरेखित केली.

पद्मश्री डॉ. शैलेश नायक यांनी अधोरेखित केले की, आयआयटीएम दीर्घकाळापासून त्याच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते आणि आता ही संस्था 'इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स'  म्हणून विकसित झाली आहे.

या कार्यक्रमात 'उत्कृष्ट योगदानासाठी आयआयटीएम पुरस्कार' जाहीर करण्यात आले, 75  वर्षे पूर्ण केलेल्या माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच डॉ. सारा ए. यांनी "हवामान बदलाचे वर्तमान आणि भविष्य"  या विषयावर स्थापना दिन व्याख्यान दिले.

65 व्या स्थापना दिनाने आयआयटीएमच्या वैज्ञानिक वचनबद्धतेबाबत विचार मांडण्याची , भारताची हवामान आणि जलवायु पूर्वानुमान  क्षमता अधिक बळकट करण्याची, तसेच संशोधनाचे रूपांतर समाजाला लाभदायक  उपाययोजनांमध्ये करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

***


 Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337851) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English