संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सदर्न स्टार आर्मी विमेन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे 'अस्मिता - अदम्य नारी 2026 चे आयोजन, शौर्य आणि कर्तृत्वाचा गौरव

सैन्यदलातील सहा महिलांनी संकटांवर मात करण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगितली, तसेच सर्वसमावेशक राष्ट्र उभारणीतील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला

Posted On: 17 NOV 2026 6:15PM by PIB Mumbai

सदर्न स्टार आर्मी विमेन्स वेल्फेअर असोसिएशनने 16 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात अस्मिता - अदम्य नारी 2026 चे आयोजन केले, ज्यामध्ये सैन्यदलातील महिलांचे शौर्य, लवचिकता आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. या उपक्रमात ज्या महिला वैयक्तिक आव्हानांवर मात करत दृढनिश्चय, आत्मविश्वासाबरोबरच त्या उद्देशपूर्ण जीवनाची प्रेरणादायी उदाहरणे म्हणून उदयास आल्या आहेत, अशा महिलांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाने महिलांना त्यांचे जीवनानुभव आणि संकटांवर मात करण्याचा प्रवास, संघर्षानंतर जीवनाची पुनर्बांधणी, प्रतिकूल परिस्थितीतही आकांक्षांचा पाठपुरावा आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याविषयी सांगण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

वैशाली अमोल गोरे, मेजर एरिका सुसान डॅनियल, मनीषा कुमारी, संध्या राणी, लेफ्टनंट कर्नल स्पंदना रेड्डी आणि चित्रलेखा नवले या सहा प्रेरणादायी महिलांनी धैर्य आणि चिकाटीच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकत आपल्या प्रभावी कथा सांगितल्या.

या कार्यक्रमाला एडब्ल्यूडब्ल्यूएच्या  माजी अध्यक्ष वीणा नरवणे, कला सल्लागार, सांस्कृतिक मुत्सद्दी आणि शास्त्रीय नृत्यांगना डॉ. उषा राधाकृष्णन, आणि सायशा इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका जयश्री रतन यांची उपस्थिती लाभली.

उपस्थितांना संबोधित करताना, सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूएच्या प्रादेशिक अध्यक्ष अनुपमा पुष्कर यांनी महिलांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी, त्यांच्या अंगभूत क्षमता ओळखण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी लष्करी परिवारात परस्पर सहकार्य, आत्मविश्वास, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण वाढवण्याच्या एडब्ल्यूडब्ल्यूएच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सर्वसमावेशक राष्ट्र उभारणीच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या संदर्भात या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये सशस्त्र दलांशी संबंधित महिलांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानही मान्य करण्यात आले. त्या कुटुंबांना आणि समाजाला बळकट करत, सेवेची नीतिमत्ता जपत, अद्वितीय वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जातात.

अस्मिता - अदम्य नारी 2026 ने पुन्हा एकदा अधोरेखित केले की सन्मानाने आणि दृढनिश्चयाने आव्हानांवर मात करण्याच्या क्षमतेमध्येच एक अदम्य शक्ती दडलेली आहे, तसेच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीमध्ये सक्षम महिलांच्या भूमिकेवर विशेष भर दिला गेला.

***

Nilima Chitale / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337698) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English