Posted On:
15 NOV 2026 10:28AM by PIB Mumbai
लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल धीरज सेठ 16 ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चेक प्रजासत्ताकाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे, लष्करी संबंध वाढवणे आणि संरक्षण तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रात सहकार्याच्या संधीसाठी अन्वेषण करणे, हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
या दौऱ्यादरम्यान, लष्करप्रमुख प्राग येथील सर्वसाधारण कर्मचारी मुख्यालयात (GSHQ) सर्वसाधारण कर्मचारी लेफ्टनंट जनरल पेट्र चेपेलका आणि संरक्षण उपप्रमुख यांच्यासह चेक सशस्त्र दलाच्या वरिष्ठ लष्करी नेत्यांशी चर्चा करतील. लष्करप्रमुख जीएसएचक्यू येथे पुष्पहार अर्पण करण्याच्या सोहळ्यादरम्यान शहीद जवानांना आदरांजली वाहतील. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. या भेटींमध्ये लष्करी सहकार्य, प्रशिक्षण, आधुनिकीकरण आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने यांसारख्या परस्पर हिताच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून, जनरल धीरज सेठ चेक सशस्त्र दलांचे विशेष प्रशिक्षण, परिचालन क्षमता आणि भविष्यातील सज्जता याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ब्रनो येथील संरक्षण विद्यापीठ आणि नाटो संयुक्त रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक संरक्षण उत्कृष्टता केंद्राला भेट देतील.
लष्करप्रमुख संरक्षण तंत्रज्ञान आणि उद्योगातील सहकार्याच्या संधींचे अन्वेषण करण्यासाठी आंतर-शासकीय संरक्षण सहकार्य संस्था (AMOS), संरक्षण आणि सुरक्षा उद्योग संघटना आणि प्रमुख संरक्षण उत्पादकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.
ही भेट, प्रदीर्घकाळ चालणारा लष्करी संवाद, व्यावसायिक देवाणघेवाण आणि औद्योगिक सहकार्याच्या माध्यमातून द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याप्रती भारत आणि झेक प्रजासत्ताक यांची सामायिक वचनबद्धता दर्शवते.

***
शिल्पा पोफळे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com