वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल आपल्या अधिकृत दौऱ्यासाठी इजिप्तमधील कैरो येथे दाखल


पियुष गोयल यांनी हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीत भारतीय सैनिकांना वाहिली आदरांजली आणि कैरोमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांची घेतली भेट

भारत-इजिप्त रणनैतिक सहयोग अधिक दृढ करणे आणि व्यापार, गुंतवणूक व औद्योगिक विकास या क्षेत्रांतील सहकार्य वाढवणे, हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांसोबत,130 हून अधिक व्यावसायिक नेते आणि स्टार्ट-अप्सचा समावेश असलेले व्यावसायिक शिष्टमंडळ आहे.

Posted On: 15 NOV 2026 9:55AM by PIB Mumbai

 

भारत-इजित या दोन्ही देशांमधील रणनैतिक सहयोग मजबूत करणे, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक यासाठी परस्पर संबंध अधिक दृढ करणे, दोन्ही देशांमधील उद्योग आणि व्यवसायासाठी नवीन संधी शोधणे, या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि मंत्री पियुष गोयल 14 नोव्हेंबर 2026 पासून अधिकृत दौऱ्यांसाठी इजिप्तमधील कैरो येथे उपस्थित आहेत.

भारत आणि इजिप्त यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परस्परांच्या नागरीकांत मूलाधार आधारित दीर्घकालीन नातेसंबंध आहेत. गेल्या काही वर्षांत, हे संबंध राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि सांस्कृतिक सहकार्याचा समावेश असलेल्या बहुआयामी भागीदारीमध्ये विकसित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाअंतर्गत भारत-इजिप्त संबंधांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांचे रुपांतर उच्च दर्जाच्या रणनैतिक द्विपक्षीय संबंधांत झाले असून, त्यात आर्थिक क्षेत्रासह वाढीव सहकार्यासाठी सामायिक वचनबद्धतेचा अंतर्भाव आहे.

आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीला, पियुष गोयल यांनी कैरो येथील हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीत भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या बलिदानाचा व योगदानाचा यथोचित सन्मान केला. या स्मशानभूमीत दफन केलेल्या किंवा आठवण जपलेल्या 4,000 सैनिकांत 3727 भारतीय सैनिक होते. त्यांपैकी सुमारे 2,000 जणांनी पहिल्या महायुद्धात आणि सुमारे 1,700 जणांनी दुसऱ्या महायुद्धात आपले प्राण गमावले होते.

मंत्री महोदयांनी इजिप्तमधील इंडियन कम्युनिटी असोसिएशनने आयोजित केलेल्या भारतीय समुदायाच्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधितही केले. या संवादामुळे परदेशस्थ भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधण्याची आणि दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक व लोकांमधील परस्पर संबंध दृढ करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्याची संधी त्यांना मिळाली.

सुमारे 6.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार हा दोन प्राचीन संस्कृतींमधील भागीदारीची केवळ सुरुवात असे सांगत; भारत-इजिप्त संबंधातील सामर्थ्यावर पियुष गोयल यांनी या प्रसंगी बोलताना प्रकाश टाकला. इथे असलेल्या भारतीय समुदायाला दोन्ही देशांमधील एक जिवंत पूल असल्याचे संबोधून, त्यांनी इजिप्तमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 70 भारतीय कंपन्यांच्या योगदानावर भर दिला, ज्यांत 5 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे; जेणेकरून इजिप्शियन लोकांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला आहे, असेही नमूद केले. 

इजिप्तमधील भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून  असून, तो व्यापारी देवाणघेवाण, व्यावसायिक सहकार्य आणि व्यापक भारत-इजिप्त संबंधांमध्ये योगदान देत आहे.या दौऱ्यात भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीचे (जेटीसी) 7 वे सत्र, भारत-इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषदेची (जेबीसी) बैठक आणि भारत-इजिप्त व्यवसाय मंच यांचा समावेश असेल. या दरम्यान 15 नोव्हेंबर 2026 रोजी कैरो येथे भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीचे 7 वे सत्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इजिप्तचे गुंतवणूक आणि विदेशी व्यापार मंत्री महामहिम डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांच्या सह-अध्यक्षतेखाली पार पडेल.

या कार्यक्रमात इजिप्तच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका, प्रमुख व्यावसायिक प्रतिनिधींसोबत संवाद आणि आफ्रिकन एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक, इजिप्शियन ज्युनियर बिझनेसमन असोसिएशन व इजिप्त-इंडिया स्टार्टअप्स फोरम यांच्यासोबतच्या बैठकांचाही समावेश असेल. या उपक्रमांमुळे द्विपक्षीय आर्थिक सहकार्याचा आढावा घेण्यासाठी, व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी, तसेच व्यावसायिक भागीदारीसाठी नवीन मार्ग ओळखण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर, द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक सहकार्य आणि नवोन्मेष यांच्यातील संबंधांना नवी चालना मिळेल.

***

शिल्पा पोफळे/संपदा पाटगांवकर/परशुराम कोर


(Release ID: 2336440) अभ्यागत कक्ष : 10