सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘नशामुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषेत’ 25,607 पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग

Posted On: 10 NOV 2026 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

'नशामुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषा' या ऑनलाईन स्पर्धेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत सहभागी नागरिकांची संख्या 25,600 पेक्षा जास्त झाली आहे. नशामुक्त भारताच्या निर्मितीतील या सामूहिक प्रयत्नांमध्ये नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा वाढता सहभाग आणि जनजागृती स्पष्टपणे दिसून येते.

ही प्रश्नमंजुषा भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत 26 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू करण्यात आली. अंमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी समाजात जागृती निर्माण करणे आणि नशामुक्त भारत घडवण्यात नागरिकांना, विशेषतः युवा वर्गाला, सक्रिय योगदानासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून ती सर्व नागरिकांसाठी खुली आहे. तसेच, इच्छुक सहभागी 'MY Bharat' पोर्टलद्वारे या उपक्रमात प्रवेश करू शकतात आणि या देशव्यापी जनजागृती अभियानात आपला सहभाग नोंदवू शकतात.

सहभागासाठीची लिंक: https://mybharat.gov.in/quizzes/yuva/detail/Url9dlIwCinQVSf8lwPB9w/ 

15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या 'नशामुक्त भारत अभियाना'चा मुख्य उद्देश प्रतिबंधात्मक शिक्षण, जनजागृती, उपचार, पुनर्वसन आणि जनसहभागाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या प्रयत्नांना बळ देणे हा आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. या अभियानाच्या व्यापक प्रसार आणि जनजागृती उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. या मोहिमेने आतापर्यंत तब्बल 35.84 कोटींपेक्षा जास्त सहभागींपर्यंत मजल मारली असून यामध्ये 14.33 कोटी तरुण आणि 11.32 कोटी महिलांचा समावेश आहे. 

हे अभियान आता आपल्या सातव्या वर्षात पदार्पण करत असल्याचे सांगताना अधिकारी म्हणाले की अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांची समज अधिक सखोल करणे, योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे आणि युवा वर्गाला जनजागृती व प्रतिबंध मोहिमेचे सक्रिय दूत बनण्यास प्रोत्साहित करणे हेच सध्या सुरू असलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे मुख्य ध्येय आहे. 

या स्पर्धेत एकूण 20 बहुपर्यायी प्रश्न असून ते सोडवण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. ही प्रश्नमंजुषा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सहभागींना अचूक उत्तरेदेखील पाहता येतील, ज्यामुळे अंमली पदार्थ प्रतिबंधाविषयीच्या त्यांच्या ज्ञानात आणि समजात भर पडेल.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय सर्व नागरिकांना, विशेषतः तरुणांना, 25 नोव्हेंबर 2026 पूर्वी या 'नशामुक्त युवा, विकसित भारत प्रशनमंजुषेत सहभागी होण्याचे आणि नशामुक्त भारताच्या या सामूहिक स्वप्नात आपले सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

     

 

* * *

माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334798) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English , हिन्दी