ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
Posted On:
10 NOV 2026 5:45PM by PIB Mumbai
मुंबई, 10 नोव्हेंबर 2026
भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने जुलै 2026 च्या चौथ्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजना (देशांतर्गत) [ओएमएसएस (डी)] अंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे.
तांदळाचा साठा खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांनी एफसीआयच्या ई-लिलाव सेवा पुरवठादार एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड (https://www.valuejunction.in/fci/) यांच्याकडे स्वतःची नोंदणी करून घेऊन बोली प्रक्रियेत सहभागी व्हावे. नोंदणी करू इच्छिणाऱ्या पक्षांसाठी नोंदणीची प्रक्रिया 72 तासांच्या आत पूर्ण केली जाईल.
महाराष्ट्र विभागातून आगामी 11.11.2026 आणि 12.11.2026 रोजी होणाऱ्या लिलावांसाठी एकूण 2,500 मेट्रिक टन तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे ग्राहक, पीठ गिरणी चालक, तांदळापासून उत्पादने तयार करणारे उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग, खासगी व्यापारी, सहकारी संस्था आणि सहकारी महासंघ (विशिष्ट श्रेणीअंतर्गत परवानगी असेल तेथे) या लिलावात सहभागी होण्यास पात्र आहेत. बोलीसाठी किमान प्रमाण 1 मेट्रिक टन असून, प्रत्येक बोलीदारासाठी तांदळाच्या खरेदीची कमाल मर्यादा 7,000 मेट्रिक टन असेल.
ओएमएसएस (डी) योजनेमुळे वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास मदत होईल.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai