ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
Posted On:
10 NOV 2026 5:50PM by PIB Mumbai
मुंबई, 10 नोव्हेंबर 2026
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने खुल्या बाजारातील विक्री (देशांतर्गत) योजनेअंतर्गत [OMSS (D) Open Market Sale Scheme (Domestic)] ई लिलावाद्वारे समर्पित वाहतूक सुविधेच्या माध्यमातून, तांदूळ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
याअंतर्गत तांदळाचा साठा खरेदी करण्यास उत्सुक असलेले खरेदीदार, भारतीय अन्न महामंडळाच्या एम जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड (https://www.valuejunction.in/fci/) या ई लिलाव सेवा पुरवठादाराकडे नोंदणी करू शकतात, तसेच या बोली प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.
खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) 11.11.2026 रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी महाराष्ट्र क्षेत्रातून, समर्पित वाहतूक सुविधेद्वारे एकूण 19,250 मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
घाऊक ग्राहक, पीठाची गिरणी चालवणारे, तांदळाच्या उत्पादनांचे उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग, खाजगी व्यापारी, सहकारी संस्था आणि सहकारी महासंघ (विशेष श्रेणीअंतर्गत परवानगी असलेल्या ठिकाणी) या लिलावात भाग घेऊ शकणार आहेत.नोंदणीकृत बोलीदार किमान 2,750 मेट्रिक टन इतक्या प्रमाणासाठी बोली लावू शकतील.
यशस्वी बोलीदाराला महाव्यवस्थापकांना (क्षेत्रीय) माल पोहचवण्याचे रेल्वे स्थानक कळवावे लागेल. खुल्या बाजारात विक्री योजनेमुळे (देशांतर्गत) वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai