Posted On:
09 NOV 2026 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026
केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी 06 ते 09 नोव्हेंबर 2026 या काळात सौदी अरेबियाचा औपचारिक दौरा केला. भारतीय शिष्टमंडळात अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव (हज) आणि भारतीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.

09 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय मंत्र्यांनी सौदी अरेबियाच्या जेद्दाह सुपरडोम येथे हज आणि उमराह मंत्री डॉ. तौफीक बिन फौझान अल-राबिया यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. सौदी अरेबियातील भारताचे राजदूत आणि संयुक्त सचिव (हज) यांनी हज-2027 च्या व्यवस्थांवरील फलदायी चर्चेत भाग घेतला. मंत्र्यांनी हज-2027 च्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला, द्विपक्षीय समन्वय व लॉजिस्टिक सहकार्य मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली आणि प्रत्येक भारतीय हज यात्रेकरूसाठी सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी यात्रा सुनिश्चित करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. बैठकीनंतर, दोन्ही बाजूंनी हज-2027 साठी भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान द्विपक्षीय हज करारावर जेद्दाह येथे स्वाक्षरी केली. भारतासाठीचा देशाचा कोटा 175,025 निश्चित करण्यात आला.
भारत आणि सौदी अरेबियातील धोरणात्मक भागीदारी दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्परांशी संबंध यावर आधारित असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले, तसेच प्रत्येक भारतीय यात्रेकरूसाठी यशस्वी आणि आरामदायी हज यात्रेचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सहकार्याच्या भावनेचा पुनरुच्चार केला.

08 नोव्हेंबर 2026 रोजी रिजिजू 6 व्या हज परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री डॉ. तौफीक अल-राबिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी झाले. त्यांनी यात्रेकरूंच्या कल्याणासाठी सौदी नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेबद्दल भारतातर्फे आभार व्यक्त केले आणि हज-2027 साठी जवळच्या द्विपक्षीय सहकार्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.


या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री रिजिजू जेद्दाह येथील इंडिया हाऊस येथे आयोजित 'नूर-ए-दिवाळी' उत्सवात सहभागी झाले आणि त्यांनी भारतीय समुदायातील सदस्य आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्यासाठी भारतीय वंशाच्या लोकांच्या योगदानाचे कौतुक केले आणि भारत व सौदी अरेबिया दरम्यान मैत्री आणि सद्भावनेचा जागता पूल म्हणून त्यांच्या भूमिकेची प्रशंसा केली. रिजिजू यांनी हज-2027 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय महावाणिज्य दूतावास, अल्पसंख्याक कामकाज मंत्रालय आणि भारतीय हज समितीच्या अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठकीचे अध्यक्षपदही भूषवले.

ही भेट भारत-सौदी अरेबियाच्या दीर्घकालीन भागीदारीला अधिक बळकट करत असून हज व्यवस्थापन, यात्रेकरूंचे कल्याण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्परसंबंध याविषयीच्या वाढत्या द्विपक्षीय सहकार्याप्रति सामायिक वचनबद्धतेची पुष्टी करत आहे.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com