पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करण्याच्या कृतीचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 08 NOV 2026 10:20AM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजऱ्या करण्याच्या भावनिक कृतीचे आणि अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी, ही भावनिक कृती, महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करत असल्याचा करुणा भाव अधोरेखित होत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात लिहिले आहे की,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, नागपूरमधील नरखेड तालुक्यातल्या लोहरी सावंगा गावातील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करण्याची कृती तसेच अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करण्याची कृती अत्यंत भावनिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी काम आणि त्याचे कल्याण सुनिश्चित करण्याासाठी काम करत असल्याचे अधोरेखित होते.

***

अंबादास यादव/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334097) अभ्यागत कक्ष : 7