सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची दिल्ली हाट, आयएनए (INA) येथील 'शिल्प समागम मेळावा 2026' ला भेट

Posted On: 06 NOV 2026 8:38PM by PIB Mumbai

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीतील आयएनए परिसरातील दिल्ली हाट येथे आयोजित ‘शिल्प समागम मेळावा 2026’ ला भेट दिली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), सफाई कर्मचारी आणि दिव्यांग व्यक्तींमधील कारागीर आणि लाभार्थ्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या मंत्रालयाच्या उपक्रमाची पाहणी करताना  रामदास आठवले यांनी विविध स्टॉल्सना भेट दिली. या माध्यमातून त्यांच्या उद्योजकीय क्षमतेला प्रोत्साहन देण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

शिल्प समागम मेळावा हा पारंपरिक कारागीर आणि उद्योजकांना ग्राहकांशी जोडणारा, बाजारपेठेशी थेट संपर्क निर्माण करणारा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या संधी अधिक बळकट करणारा महत्त्वपूर्ण मंच ठरला आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय 2022 पासून शिल्प समागम मेळाव्यांचे आयोजन करत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. या मेळाव्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग आणि सफाई कर्मचारी समुदायांतील हजाराहून अधिक कारागिरांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्याची आणि त्यांची विक्री करण्याची संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

या कारागिरांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मोफत स्टॉल, प्रवास खर्च, दैनंदिन भत्ता तसेच त्यांच्या उत्पादनांच्या वाहतुकीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते अशी माहितीही आठवले यांनी दिली.

 

1 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या मेळाव्यात सहभागी झालेल्या चार महामंडळांच्या माध्यमातून सुमारे 37.90 लाख रुपयांच्या एकूण विक्रीची नोंद झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (NSFDC), राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) आणि राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त आणि विकास महामंडळ (NDFDC) यांचा समावेश आहे.

 

दिल्ली हाट, आयएनए येथील हा 'शिल्प समागम मेळावा 2026' हा 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

 

***

Sushma Kane / ashutosh Save / Madhura Nerurkar 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333855) अभ्यागत कक्ष : 4
Read this releasein: English