Posted On:
06 NOV 2026 5:56PM by PIB Mumbai
भारत आणि म्यानमार यांच्यातील पहिल्या द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव - राहत मित्र - ची सुरुवात 5 नोव्हेंबर 2026 रोजी चेन्नई येथे झाली. हा सराव 5 ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केला जात आहे.
मानवतेसाठी एकत्र, भागीदारीतून अधिक सक्षम या संकल्पनेवर आधारित हा सराव, दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमधील द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे, परस्पर विश्वास वाढवणे आणि समन्वयामध्ये सुधारणा करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
हा पहिलाच सराव भारत आणि म्यानमारच्या संरक्षण दलांना व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, मोहिमांचे अनुभव सामायिक करण्यासाठी आणि मानवी मदत व आपत्ती निवारण मोहिमांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यामध्ये दोन्ही देशांच्या तिन्ही दलांमधील 300 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत, हे मानवी सहकार्य आणि प्रादेशिक आपत्ती प्रतिसादाप्रति असलेल्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
भारतीय नौदलाच्या समन्वयाखाली आयोजित राहत मित्र सराव, भारत आणि म्यानमार यांच्यातील संरक्षण सहकार्य आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हा सराव भारताच्या ‘शेजारधर्माला प्राधान्य’ या धोरणाप्रति आणि ‘महासागर’ अर्थात सर्व प्रदेशांमधील सुरक्षितता आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती या धोरणात्मक दृष्टिकोनाप्रति भारताची वचनबद्धता दर्शवतो. तसेच, शांतता व स्थैर्य राखण्यासाठी आणि संकटकाळात मानवी मदत पुरवण्यासाठी दोन्ही देशांचा सामायिक संकल्प या सरावामुळे अधिक बळकट होईल.
_20261106175733_7dee3d.jpeg)
_20261106175743_01ff8f.jpeg)
_20261106175753_3acefd.jpeg)
_20261106175803_466bdd.jpeg)
***
Sushma Kane / Shailesh Patil / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai