Posted On:
06 NOV 2026 7:51PM by PIB Mumbai
एअर मार्शल यल्ला उमेश, व्हीएसएम, पीएचडी, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड, भारतीय हवाई दल, यांनी दिवाळीनिमित्त कोरवा येथील हवाई दल संपर्क आस्थापनेला भेट दिली. त्यांच्या समवेत एअर फोर्स फॅमिलीज वेल्फेअर असोसिएशन (प्रादेशिक) च्या अध्यक्ष यल्ला श्रीवल्ली या देखील होत्या.
या भेटीदरम्यान, एअर मार्शल यांनी युनिटच्या विविध परिचालन सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांना युनिटची परिचालन संबंधित कामे, हाती घेतलेले उपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल माहिती देण्यात आली. हवाई योद्ध्यांना संबोधित करताना, त्यांनी त्यांचे अढळ समर्पण, अनुकरणीय व्यावसायिकता आणि सेवेप्रति असलेल्या दृढ वचनबद्धतेची प्रशंसा केली. तसेच उत्कृष्टतेसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आणि नव्या आव्हानांना दृढनिश्चयाने आणि लवचिकतेने सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिवाळीचे महत्त्व अधोरेखित करताना एअर मार्शल यल्ला उमेश म्हणाले की, अशा प्रसंगांच्या निमित्ताने संरक्षण दलांमध्ये सौहार्द, एकता आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होतो . दिवाळी सणाच्या निमित्ताने एअर मार्शल आणि यल्ला श्रीवल्ली यांनी मिठाईचे वाटप केले आणि हवाई योद्धे आणि संगिनींशी संवाद साधला.
भारतीय हवाई दलाची ओळख असणाऱ्या एकता, समर्पण आणि सेवेच्या भावनेला बळकटी देत उत्साहवर्धक वातावरणात ही भेट संपन्न झाली.

_20261106202302_668fd7.jpeg)

_20261106202338_dccded.jpeg)

***
Sushma Kane / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai