रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने ऑपरेशन डीप (DEEP) या 15 दिवसांच्या विशेष तिकीट तपासणी मोहीमेचा प्रारंभ


दिवाळी सणानिमीत्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विनातिकीट प्रवासाला आळा घालणे आणि सुरळीत प्रवासाची सुनिश्चिती करण्यासाठीची विशेष मोहीम

Posted On: 04 NOV 2026 6:40PM by PIB Mumbai

मुंबई, 4 नोव्‍हेंबर 2026

 

दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांच्या संख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने ऑपरेशन डीप (DEEP - Detect, Examine, Enforce, Penalize) ही विशेष मोहीम सुरु केली आहे. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत ही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाईल. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालणे, प्रवासातील शिस्तीला चालना देणे तसेच वैध प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी होईल हे सुनिश्चित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आगामी सणाच्या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि रेल्वेच्या नियमांचे पालन होत राहील याची सुनिश्चित करण्यासाठी, संपूर्ण मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

या मोहीमेच्या डीप (DEEP) या लघुनामाअंतर्गत कार्यान्वयनाच्या अनुषंगाने दर्शवलेल्या चार धोरणात्मक स्तंभाना अनुसरून तिकीट तपासणी विषयक विविध उपक्रम हाती घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले. याअंतर्गत विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांचा शोध घेणे (Detect), तिकिटांची तपासणी करून वैध ओळखपत्रांची पडताळणी करणे (Examine), अवाजवी गर्दी रोखण्यासाठी व प्रवासातील शिस्त राखण्यासाठी रेल्वेच्या नियमांची अंमलबजावणी करणे (Enforce), आणि रेल्वे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे (Penalize) अशा उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला रेल्वे प्रवास त्रासमुक्त असावा आणि दंडात्मक कारवाई टाळता यावी यासाठी सर्व प्रवाशांनी वैध रेल्वे तिकीट खरेदी करूनच प्रवास करावा, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने केले आहे. प्रवाशांनी अधिक सोयीसाठी डिजिटल तिकीट सुविधांचा वापर करावा, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने केले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332715) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English