Posted On:
03 NOV 2026 8:48PM by PIB Mumbai
नागपूर, 3 नोव्हेंबर 2026
सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), नागपूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गुवाहाटी यांनी संयुक्तपणे 3 आणि 4 नोव्हेंबर 2026 दरम्यान सीएसआयआर-नीरी सभागृह, नागपूर येथे शैवाल संशोधनावरील चौथ्या वार्षिक चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन 3 नोव्हेंबर 2026 रोजी झाले.
AAR 2026 च्या ॲबस्ट्रॅक्ट पुस्तिकेचे अनावरण करताना मान्यवर आयआयटी गुवाहाटीचे प्रा. कौस्तुभ मोहंती आणि एएआर चर्चासत्र मालिकेचे अध्यक्ष यांनी सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी शैवाल संशोधकांना एकत्र आणण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी शैवाल संशोधकांसाठी एक संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित केले आणि हे चर्चासत्र संशोधन समुदायाला अधिक बळकट करेल अशी आशा व्यक्त केली.
सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांनी प्रत्यक्ष वापरासाठी शैवाल संशोधन प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष कार्यस्थळी नेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि पर्यावरण शाश्वततेसमोरील आव्हाने सोडवण्यात त्यातील क्षमता अधोरेखित केली.

सीएसआयआर-नीरीच्या ईएचटी विभागाचे प्रमुख आणि चर्चासत्राचे सह-अध्यक्ष डॉ. के. कृष्णमूर्ती यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि जैव-आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी, व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आणि पर्यावरण शाश्वतता पुढे नेण्यासाठी शैवाल संशोधनाची क्षमता स्पष्ट केली.
सीएसआयआर-नीरीचे शास्त्रज्ञ आणि चर्चासत्राचे निमंत्रक डॉ. अमित बाफना यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली, ज्यामध्ये शैवाल संशोधनाच्या विविध पैलूंवर निमंत्रित व्याख्याने, मौखिक आणि पोस्टर सादरीकरणांचा समावेश होता.
आयआयटी मद्रासचे प्रा. आर. विनू यांनी "मॅक्रोअल्गी सीवीड टू प्लॅटफॉर्म केमिकल्स व्हिया थर्मोकेमिकल अँड कॅटॅलिटिक पाथवेज" या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी समुद्री शेवाळाचे (सीवीड) मूल्यवर्धित रसायनांमध्ये रूपांतर करण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला.
उद्घाटन सत्रात AAR 2026 च्या ॲबस्ट्रॅक्ट पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.
या चर्चासत्रात शैवाल संशोधनातील योगदानाची दखल घेण्यासाठी AAR 2026 एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. नॅनोप्लास्टिकच्या संपर्कात आल्यावर सूक्ष्म शेवाळाच्या (मायक्रोअल्गी) जुळवून घेण्याच्या क्षमतेवरील संशोधनासाठी आयआयटी रुरकीच्या डॉ. कृष्ण मोहन पोलुरी यांना 'मिड-करिअर अवॉर्ड' मिळाला. सांडपाणी प्रक्रिया आणि बायोमास वापरासाठी जैव-विघटनशील शेवाळ बायोफिल्म विकसित केल्याबद्दल एसएसएस-एनआयबीई, कपूरथळा येथील डॉ. संजीव मिश्रा यांना 'अर्ली करिअर अवॉर्ड' मिळाला. बायोएनर्जी ऍप्लिकेशन्ससाठी नॅनोपार्टिकल-मायक्रोअल्गी परस्परसंवादावरील संशोधनासाठी एसआरएमआयएसटी, कट्टनकुलथुर येथील डॉ. मोहित सिंग राणा यांना 'इमर्जिंग करिअर अवॉर्ड' मिळाला. डायटम-आधारित नॅनो-बायो-पेस्टिसाइड्स विकसित केल्याबद्दल आयआयटी दिल्लीचे डॉ. सुमित धाली यांना 'सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंध पुरस्कार' मिळाला, तर सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबच्या निकिता देबनाथ यांना विविध पोषक स्त्रोतांद्वारे शेवाळ बायोमास आणि लिपिड उत्पादन सुधारण्याच्या संशोधनासाठी 'सर्वोत्कृष्ट मास्टर प्रबंध पुरस्कार' मिळाला.

निमंत्रित व्याख्यानांमध्ये बायोरिफायनरीज, सांडपाणी प्रक्रिया, कार्बन कॅप्चर, बायोरेमेडिएशन, शाश्वत शेती आणि मूल्यवर्धित उत्पादने यासह शैवाल संशोधनाच्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होता.
या कार्यक्रमात सांडपाणी बायोरिमेडिएशन आणि संसाधन पुनर्प्राप्ती, तसेच कार्बन कॅप्चर आणि हवामान बदल कमी करण्याच्या उपायांवर संक्षिप्त तोंडी सादरीकरणे समाविष्ट होती. पोस्टर सत्राने संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य सादर करण्याची आणि तज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली.
या चर्चासत्रात संशोधक, शास्त्रज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विद्यार्थी एकत्र आले, ज्यांनी शैवाल संशोधनातील सद्य प्रगतीवर चर्चा केली आणि सहकार्य व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संधींचा शोध घेतला.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai