श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील ईपीएफओ कार्यालयाने आयोजित केलेल्या विशेष कर्मचारी नोंदणी अभियानाने 2,220 पेक्षा जास्त कामगारांना सामाजिक सुरक्षा छत्राच्या कक्षेत आणले


गोव्यातील 205 आस्थापनांचा विशेष नोंदणी अभियानात सहभाग

Posted On: 02 NOV 2026 4:39PM by PIB Mumbai

‍पणजी , 2 नोव्हेंबर 2026

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) गोवा येथील क्षेत्रिय कार्यालयाने आपले  विशेष कर्मचारी नांवनोंदणी अभियान (इइसी-2026) यशस्वीरित्या पूर्ण केले आणि राज्यातील205 आस्थापनांमधील 2,220 कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कायद्याच्या कक्षेत आणले.

31 ऑक्टोबर 2026 रोजी सांगता झालेल्या या अभियानाचा उद्देश अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळवून देणे आणि आधी नांवनोंदणी न केलेल्या कामगारांची नांवनोंदणी करण्यास नियोक्त्यांना प्रोत्साहन देणे हा होता. यामध्ये 1 एप्रिल 2009  ते 31 मार्च 2026 या कालावधीतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या अभियानाचा एक भाग म्हणून इपीएफओने व्यापक सहभागासाठी नियोक्त्यांना विशेष सवलत दिली होती. गेली काही वर्षे ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून पीएफ वजा करण्यात आलेला नाही, अशा पात्र कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यासाठी नियोक्त्यांनी पीएफमधील आपले योगदान न देण्याची सवलत त्यांना देण्यात आली होती. कलम 14 बी अंतर्गत आकारण्यात येणारी दंडाची रक्कम देखील सर्व योजनांचा समावेश करुन शंभर रुपये प्रती आस्थापना इतकी कमी करण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केलेल्या अथवा या अभियानामध्ये नव्याने नांवनोंदणी केलेल्या नियोक्तेदेखील प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या (पीएम-व्हीबीआरवाय) पात्रता निकषांच्या अधीन राहून  या सवलतीचा लाभ घेण्यास पात्र ठरले.  

इइसी-2026 च्या यशस्वी पूर्ततेनंतर गोव्यातील आणखी 2,220 कर्मचारी इपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत आले. या कर्मचाऱ्यांना आता भविष्यनिर्वाह निधी बचत आणि नियोक्ता निधी संलग्न विमा योजनेअंतर्गत विमा सुरक्षा यासारखे लाभ मिळतील.  

गोव्यातील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळवून देणे आणि कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वित्तीय सुरक्षेची हमी मिळवून देणे यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. 


पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331593) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English