Posted On:
01 NOV 2026 6:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू-मुंबई वंदे भारत शयनयान रेल्वेगाडी, रेल्वे संपर्क व्यवस्थेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित केले आहे. वंदे भारत शयनयान रेल्वे बेंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या दळणवळणाला अधिक सक्षम करणारी ठरून, प्रवास अधिक सोयीस्कर करेल आणि दोन राज्यांमधील संपर्कव्यवस्था मजबूत करेल, असे ते म्हणाले. या सेवेचा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील जनतेला, विशेषतः तरुण वर्ग, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले आहे:
तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे शहर असलेल्या बेंगळुरूमधून उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल! बेंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अत्यंत क्रांतिकारक आणि मैलाचा दगड ठरणारी ठरेल. या ट्रेनचा मोठा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राला होईल, विशेष करून तरुणांना, आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळेल.
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com