परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारपत्र  सेवा केंद्र 2 नोव्हेंबरपासून पिलेर्ने येथील नवीन जागेत स्थलांतरित होणार

Posted On: 01 NOV 2026 1:59PM by PIB Mumbai

पणजी, 1 नोव्हेंबर 2026

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेले पणजी इथले पारपत्रसेवा केंद्र सोमवार दिनांक 02 नोव्हेंबर 2026 पासून 'रॉयल सिटी ऑफ जॉय, ऑडिट भवनजवळ, पिलेर्ने, बार्देश, गोवा – 403114' या नवीन जागेत स्थलांतरित होत आहे.

सध्या हे पासपोर्ट सेवा केंद्र 'पासपोर्ट भवन, 13-ए, ईडीसी कॉम्प्लेक्स, पाटो प्लाझा, पणजी, गोवा – 403001' येथे सुरू आहे. 

ज्या अर्जदारांच्या अपॉइंटमेंट 02 नोव्हेंबर 2026 किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी पूर्वीच्या पणजी केंद्रावर निश्चित झाल्या आहेत, त्यांनी त्यांच्या अर्ज पावतीवर नमूद केलेल्या ठराविक वेळेत आणि तारखेला पिलेर्ने येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

दरम्यान, क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, गोवा, हे पाटो प्लाझा, पणजी येथील सध्याच्या पासपोर्ट भवनातूनच कार्यरत राहील. या क्षेत्रीय कार्यालयाचे बॅक-ऑफिस कामकाज आणि इतर सेवा—जसे की सरेंडर सर्टिफिकेट (Surrender Certificate) देणे आणि ॲपोस्टिल (Apostille) सेवा—या देखील पूर्वीच्याच कार्यालयातून पुरवल्या जातील.

पासपोर्ट सेवा केंद्राच्या या स्थलांतरामुळे उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांची सोय होईल, तसेच गोव्यातील पासपोर्ट सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

***

राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2331189) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English