भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

सॅफायर फूड्स इंडियाचे देवयानी इंटरनॅशनलमध्ये विलीनीकरण आणि संबंधित व्यवहारांना भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 31 OCT 2026 2:19PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडचे देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड’मध्ये विलीनीकरण आणि त्यासंबंधित व्यवहारांना मंजुरी दिली आहे.

यामध्ये सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडचे देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये विलीनीकरण आणि इतर संलग्न व्यवहार समाविष्ट आहेत.

देवयानी कंपनी मुख्यत्वे संपूर्ण भारतात 'केएफसी' आणि 'पिझ्झा हट'च्या फ्रँचायझी आउटलेट्सचे परिचालन करते. याशिवाय, भारतात 'कोस्टा कॉफी', 'न्यू यॉर्क फ्राईज' आणि 'सानूक किचन'चे सर्व हक्क असणारी ही एकमेव फ्रँचायझी आहे. तसेच, देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडच्या मालकीचे स्वतःचे काही स्वदेशी ब्रँड्सही असून ती त्यांचे परिचालन करते.

सॅफायर कंपनीदेखील भारतामध्ये 'केएफसी' आणि 'पिझ्झा हट' च्या फ्रँचायझी आउटलेट्सचे परिचालन करते.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330876) अभ्यागत कक्ष : 16