भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

एमआयएच पेमेंट्स होल्डिंग्ज बी.व्ही. तर्फे नावी लिमिटेडमधील विशिष्ट भागभांडवल अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 31 OCT 2026 2:20PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने एमआयएच पेमेंट्स होल्डिंग्ज बी.व्ही. तर्फे नावी लिमिटेडमधील विशिष्ट भागभांडवल अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे.

यामध्ये एमआयएच पेमेंट्स होल्डिंग्ज बी.व्ही. (अधिग्रहणकर्ता) द्वारे नावी लिमिटेड (लक्ष्य कंपनी) मधील काही भागभांडवलाच्या अधिग्रहणाचा समावेश आहे.

अधिग्रहणकर्ता ही प्रोसस एन. व्ही. ची एक अप्रत्यक्ष पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. अधिग्रहणकर्ता कंपनी स्वतः भारतात व्यवसाय करणाऱ्या आपल्या पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करत नाही.

नावी लिमिटेड ही नावी समुहाची होल्डिंग कंपनी असून ती एकाच ग्राहक-केंद्रित मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध असलेल्या वित्तीय सेवा प्रदान करते. नावी लिमिटेड आपल्या उपकंपन्यांद्वारे पारदर्शक, वापरकर्ता-अनुकूल वित्तीय उत्पादने प्रदान करते. ही सर्व उत्पादने मोबाइल उपकरणांद्वारे वापरता येतात.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330865) अभ्यागत कक्ष : 14