Posted On:
31 OCT 2026 9:10AM by PIB Mumbai
'पीएमजीएसवाय-IV (बॅच-1, आर्थिक वर्ष 2026-27) अंतर्गत, मंत्रालयाने मिझोरममध्ये सुमारे 710.40 कोटी रुपये खर्चाच्या 45 रस्ते कामांना (एकूण 509.54 किमी) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे 48 वस्त्यांना पहिल्यांदाच बाराही महिने वापरण्यायोग्य रस्ते संपर्क सुविधा उपलब्ध होईल. या रस्ते संपर्क सुविधेमुळे येथील रहिवाशांना शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण बाजारपेठांसारख्या अत्यावश्यक सेवांचा लाभ घेणे शक्य होईल, ज्यामुळे या भागातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागेल. यामुळे सरकारचे 'विकसित भारत'चे लक्ष्य गाठण्यात देखील मदत होईल.
या मंजुरीव्यतिरिक्त, आतापर्यंत 'पीएमजीएसवाय' अंतर्गत राज्यात 3,412 कोटी रुपये खर्चाच्या 367 रस्ते कामे (4,935 किमी) आणि 7 पुलांना याआधीच मंजुरी देण्यात आली आहे.
***
शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai