ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफसीआयच्या मुंबईतील पश्चिम विभाग प्रादेशिक कार्यालयाने विशेष अभियान 6 अंतर्गत स्वच्छता व कार्यक्षम नोंदी व्यवस्थापनामधे केली प्रगती

Posted On: 30 OCT 2026 10:00PM by PIB Mumbai

मुंबई , 30 ऑक्टोबर 2026

भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) मुंबईतील पश्चिम विभाग प्रादेशिक कार्यालयाने 2 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान 6 हाती घेतले आहे. या अभियानात स्वच्छतेला प्रोत्साहन, नोंदी व्यवस्थापन सुधारणा, प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा आणि कार्यालयाच्या जागेचा परिणामकारी वापर यावर भर दिला जात आहे.

या अभियानाचा भाग म्हणून कार्यालय परिसर, नोंदी ठेवण्याच्या खोल्या व कपाटे यांची स्वच्छता, इ नोंदी व्यवस्थापन, जागेचे व्यवस्थापन करण्याबाबतचे नियोजन व कचऱ्याची विल्हेवाट यासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एफसीआय प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन कार्यालय अधिक स्वच्छ, अधिक नीटनेटके व कार्यक्षम बनवण्यामध्ये योगदान दिले.

या अभियानातील स्वच्छता मोहीम, कार्यालयाचे सुशोभीकरण व इतर उपक्रमांची छायाचित्रे –

 

या अभियानादरम्यान, नोंदी व्यवस्थापन सुरळीत करण्यावर आणि कालबाह्य नोंदींची विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देण्यात आला. एकूण 2,715 फाइल तपासून 1,510 फाइल काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे कार्यालयातील 250 चौरस फूट जागा रिकामी झाली. याशिवाय 3,344 इ फाइल्स तपासण्यात आल्या, यातील 503 इ फाइल्स  पश्चिम विभाग प्रादेशिक कार्यालयाने बंद केल्या. या प्रयत्नांमुळे कार्यक्षम नोंदी व्यवस्थापनामधे लक्षणीय प्रगती झाली, प्रलंबित प्रकरणांमध्ये घट झाली आणि कार्यालयीन साहित्याचा जास्तीत जास्त क्षमतेने वापर होऊ लागला.  

विशेष अभियान 6 चा 31 ऑक्टोबर 2026 रोजी समारोप होणार असून एफसीआयच्या पश्चिम विभाग प्रादेशिक कार्यालयाने या अभियानादरम्यान साध्य केलेली उद्दीष्टे यापुढेही कायम राखली जाणार आहेत आणि सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींचा अवलंब सातत्याने केला जाणार आहे. स्वच्छता, संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याची सतर्कता, प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे आणि कार्यालयाच्या जागेचा जास्तीत जास्त परिणामकारी उपयोग करणे यासाठी हे कार्यालय नेहमीच वचनबद्ध राहील.    
 

पीआयबी मुंबई |सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2330695) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English