दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंवाद विभाग मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल हयात प्रमाणपत्र शिबिरे आयोजित करणार

Posted On: 30 OCT 2026 4:31PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

दूरसंवाद मंत्रालयाच्या अखत्यारितील मुंबई येथील प्रमुख दूरसंवाद लेखापरीक्षण नियंत्रकांचे कार्यालय मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे नोव्हेंबर 2026 मध्ये डिजिटल हयात प्रमाणपत्र (जीवन प्रमाण) सुविधा शिबिरे आयोजित करणार आहे. दूरसंवाद विभाग, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) आणि विदेश संचार निगम लिमिटेड (व्हीएसएनएल) (ओसीएस) या विभागांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना वार्षिक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

खालील वेळापत्रकानुसार सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेत ही शिबिरे होतील.

हयात प्रमाणपत्र शिबिरांचे वेळापत्रक

दिनांक

शिबिराचे ठिकाण

02.11.2026

दूरसंवाद लेखापरीक्षण विभाग प्रमुख नियामक कार्यालय, करी रोड  टेलिफोन एक्सचेंज, करी रोड  (पूर्व), मुंबई 400012

06.11.2026

घाटकोपर टेलिफोन एक्सचेंज, जुना टेलिफोन एक्सचेंज रस्ता, माणेकलाल इस्टेट, घाटकोपर (पश्चिम), मुंबई – 400086

12.11.2026

चरई टेलिफोन एक्सचेंज, मावळी मंडळ समोर, गणेश टॉकीजजवळ, धोबी आळी, ठाणे (पश्चिम) – 400601

13.11.2026

टेलिफोन हाउस, एमटीएनएल मुंबई मुख्यालय, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मुंबई – 400028

16.11.2026

कांदिवली टेलिफोन एक्सचेंज, स्वामी विवेकानंद रोड, कांदिवली पोलिस लाइन, कांदिवली (पश्चिम), मुंबई – 400067

17.11.2026

अंधेरी एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, टेलिफोन एक्सचेंज इमारत, मार्ग क्र. 2, भरुचा बाग, पारसी कॉलनी, अंधेरी (पश्चिम), मुंबई 400058

18.11.2026

वाशी टेलिफोन एक्सचेंज, सेक्टर 16 ए, बस डेपोसमोर, वाशी – 400703

20.11.2026

एमटीएनएल, जुने पनवेल टेलिफोन एक्सचेंज, एमटीएनएल रोड, एमसीसीएच सोसायटी, पनवेल – 410206

23.11.2026

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), काळा तलाव रस्ता, स्वानंद नगर, बेतूरकर पाडा, कल्याण – 421301

26.11.2026

भाईंदर टेलिफोन एक्सचेंज, फाटक रोड, श्रीपाल नगर, भाईंदर (पश्चिम), मीरा-भाईंदर – 401101

शिबीरस्थळी उपलब्ध सुविधा

सुविधा शिबिरांमध्ये निवृत्ती वेतनधारकांना खालील सुविधा पुरविल्या जातील.

  • डिजिटल हयात प्रमाणपत्र भरण्याचे प्रशिक्षण व सहाय्य
  • जीवन प्रमाण चेहरा अधिकृतता ऍप वापरण्यासाठी मार्गदर्शन
  • केवायपी अर्ज व डिजिटल हयात प्रमाणपत्र स्वीकारणे
  • निवृत्ती वेतनधारक ओळखपत्रांचे वितरण आणि नवीन ओळखपत्रांसाठी अर्ज स्वीकारणे
  • तक्रारींची नोंद व समस्येवरील समाधान

या शिबिरांना भेट देणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांनी एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक किंवा टपाल खात्याचे खाते पुस्तक सोबत ठेवावे अशी विनंती करण्यात आली आहे.

चालू वर्षासाठी ज्या निवृत्ती वेतनधारकांनी आधीच हयात प्रमाणपत्र सादर केले आहे त्यांनी यासाठी पुन्हा शिबिराला उपस्थित राहण्याची गरज नाही.

सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांनी जवळच्या ठिकाणी असलेल्या सुविधा शिबिराला त्यांच्या सोईच्या तारखेनुसार भेट द्यावी आणि तिथे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. दूरसंवाद विभागाची आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सहज आणि विनासायास सेवा उपलब्ध करुन देण्याची विभागाची वचनबद्धता या उपक्रमातून प्रतिबिंबित होते.

अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतनधारकांनी मुंबईतील दूरसंवाद लेखा परीक्षण विभागाच्या प्रमुख नियामक कार्यालयाशी संपर्क साधावा.  

पीआयबी मुंबई |सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

(Release ID: 2330446) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English