सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड (NSIC) ने आर्थिक वर्ष 2025–26 साठीचा लाभांश भारत सरकारला केला सादर


एनसीआयसीची वित्तीय कामगिरी आणि एमएसएमई क्षेत्राच्या वृद्धीला पाठबळ देण्याची कटिबद्धता अधोरेखित

Posted On: 29 OCT 2026 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2026

 

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड (NSIC) या अ श्रेणी ची मिनी रत्न कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ.सुभ्रांशु शेखर आचार्य यांनी 28 ऑक्टोबर 2026 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री  शोभा करंदलाजे यांना 47.76  कोटी रुपयांचा लाभांश सुपूर्द केला. यावेळी मंत्रालयाचे सचिव भरत खेरा तसेच मंत्रालय आणि एनएसआयसी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आचार्य यांनी एनएसआयसची भक्कम आर्थिक कामगिरी यावेळी सांगितली. महामंडळाने 3,767 कोटी रुपयांचा महसूल आणि 159 कोटी रुपयांचा करेतर नफा नोंदवला असून, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ही कामगिरी महामंडळाची सातत्यपूर्ण आर्थिक प्रगती, प्रभावी व्यवस्थापन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या वाढीस आणि स्पर्धात्मकतेस पाठबळ देण्याप्रति असलेली कटिबद्धता दर्शवते.

यावेळी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांनी, एकात्मिक पाठबळ सेवा आणि सरकारच्या अनेक उपक्रमांच्या अंमलबजावणीतून, एमएसएमई क्षेत्र मजबूत करण्यात एनएसआईसीने दिलेल्या  योगदानाचे कौतुक केले. उद्यमशीलता, उद्योग निर्मिती, कौशल्य विकास आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांना देशभरात प्रोत्साहन देण्यात, एनएसआयसी भविष्यातही आपले योगदान देत राहील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपला प्रदीर्घ अनुभव आणि संस्थात्मक क्षमता यांच्या बळावर, एनएसआयसी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवस्थेला बळकटी देण्यात तसेच आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.

   

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330288) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English