अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरंभ 2026 -एनएडीटी- आरसी, मुंबईच्या प्राप्तिकर विभागात नव्याने भरती झालेल्या निरीक्षकांसाठीच्या प्रवेश प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Posted On: 29 OCT 2026 9:36PM by PIB Mumbai

मुंबई, 29 ऑक्‍टोबर 2026

 

प्राप्तिकर विभागात नव्याने भरती झालेल्या निरीक्षकांसाठीचा प्रवेश प्रशिक्षण अभ्यासक्रम, आरंभ–2026, आज राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रादेशिक केंद्रात (NADT-RC), मुंबई इथे सुरू झाला.  

या अभ्यासक्रमाचे उद्घाटन कोची इथल्या प्राप्तिकर विभागाचे महासंचालक (अन्वेषण) अनुराग श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नव्याने भरती झालेल्या प्राप्तिकर निरीक्षकांना समर्पण, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच्या जाणिवेसह आपल्या कारकीर्दीची सुरुवात करण्याचे आवाहन केले. विभागाच्या कार्यपद्धतींचे सखोल ज्ञान, उच्च नैतिक मूल्ये आणि सार्वजनिक सेवेप्रती दृढ निष्ठा यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, प्राप्तिकर विभागाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Felicitation at the inauguration of Aarambh-2026

एनएडीटी- आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांनी प्राप्तिकर विभागात रुजू झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. त्यांनी प्रशिक्षणात  सहभाग घेऊन, भक्कम व्यावसायिक पाया घडवण्याचे आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक नोकरदारासाठी सचोटी, शिस्त, सहानुभूती, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि उत्कृष्टतेप्रति कटिबद्धता हे आवश्यक गुण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

हे प्रशिक्षण 60 दिवस चालणार असून, ते 22 जानेवारी 2027 ला संपणार आहे. या कार्यक्रमातून, त्यांना सर्व क्षेत्रातील, सर्वसमावेशक ज्ञान आणि प्रशिक्षण, कार्यपद्धती आणि वर्तनात्मक कौशल्यांच्या विविध पैलूंवर प्रशिक्षण दिले जाईल.

Address at the inauguration of Aarambh-2026 (1)   Address at the inauguration of Aarambh-2026 (2)

मिशन कर्मयोगीच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ‘प्रुडंट कर्मयोगी’ची सात वैशिष्ट्ये अंगिकारणारे नवनियुक्त निरीक्षक घडवणे आणि प्रतिसादक्षम, पारदर्शक तसेच करदाता-केंद्रित करप्रशासनात योगदान देण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330276) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English