Posted On:
29 OCT 2026 5:48PM by PIB Mumbai
नागपूर, 29 ऑक्टोबर 2026
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत,नागपूर येथील केंद्रीय संचार ब्युरो (CBC), क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने, दक्षता जागृती सप्ताह 2026 चा भाग म्हणून 29 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील कटोल रोडवरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एक जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांच्या महत्त्वाबाबत संवेदनशील करणे हा होता.

नागपूर येथील सीबीसी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुडाधे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना शपथ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांना दक्षता आणि नैतिक आचरणाविषयीची त्यांची समज व्यक्त करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला आणि निबंध-लेखन स्पर्धांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधील कामगिरीची दखल घेऊन विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
_20261029164447_7fa113.jpeg)
शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये दक्षता आणि सचोटीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, तसेच शिक्षक आणि शाळेतील कर्मचारीही या कार्यक्रमात सामील झाले. या उपक्रमाद्वारे, सीबीसी नागपूरने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा आणि त्यांना दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाद्वारे लहानपणापासूनच ही मूल्ये जोपासण्याचे आणि विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांच्या सामूहिक सहभागातून उत्तरदायित्व वाढवण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai