Posted On:
28 OCT 2026 7:21PM by PIB Mumbai
गोवा, 28 ऑक्टोबर 2026
गोवा विभागातील टपाल खात्याने मडगाव मुख्य टपाल कार्यालय आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये 2 ते 8 नोव्हेंबर 2026 या कालावधीत टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली आहे.
मडगाव येथील केंद्रीय प्रक्रिया केंद्रात 9 नोव्हेंबर 2026 पासून नवीन विमा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याने तिच्या पूर्वतयारीसाठी ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे.
या कालावधीत मडगाव मुख्य टपाल कार्यालय तसेच त्याच्या कार्यक्षेत्रातील इतर कोणत्याही टपाल कार्यालयांमध्ये ग्राहकांना टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा यांचे हप्ते भरता येणार नाहीत किंवा विम्याशी संबंधित अन्य व्यवहार करता येणार नाहीत. ही सेवा स्थगिती केवळ याच कार्यालयांपुरती मर्यादित असेल.
ग्राहकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आपल्या टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा हप्त्यांच्या भरण्याचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
या तात्पुरत्या सेवा स्थगितीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल टपाल विभागाने दिलगिरी व्यक्त केली असून, सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa