नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने बुसानमध्ये जहाजबांधणी पुरवठा साखळीपासून ते जहाज पुर्नवापर क्षेत्रापर्यंत आपली सागरी भागीदारी विस्तारली

Posted On: 27 OCT 2026 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद  सोनोवाल यांनी दक्षिण कोरियातील बुसान येथे दक्षिण कोरियन सागरी संस्था, जहाजबांधणी कंपन्या आणि जहाज वाहतूक कंपन्या, तसेच सायप्रसच्या नौवहन  उपमंत्र्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. भारताच्या जहाजबांधणीच्या महत्त्वाकांक्षेमागे आवश्यक असलेली पुरवठा साखळी, वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारपेठा उभारण्यासाठी या बैठका महत्त्वपूर्ण आहेत.

या चर्चेत जहाजबांधणी गुंतवणूक, सागरी उपकरण निर्मिती, सागरी वित्तपुरवठा, बंदर विकास, जहाज वाहतूक, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत जहाज पुर्नवापर या विषयांचा समावेश होता. 2047 पर्यंत भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी, जहाज वाहतूक आणि सागरी सेवांचे केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

दिवसातील प्रमुख मुद्दे

पुर्नवापर: पात्र जहाज-पुर्नवापर यार्डांना युरोपियन युनियनची  मान्यता मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सायप्रसने पाठिंबा दिला.

हरित जहाज वाहतूक: कोरियन उत्पादक आणि भारतीय यार्डांनी एलपीजी आणि एलएनजी कार्गो टँक, क्रायोजेनिक संरचना आणि मोठ्या जहाजांच्या भागांमध्ये भागीदारीची शक्यता पडताळून पाहिली.

वित्त: सोनोवाल यांनी कोरियन सागरी वित्तपुरवठादारांसमोर मेरीटाईम डेव्हलपमेंट फंड अर्थात सागरी विकास निधी आणि सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन  यांची संधी सादर केली.

जहाजसमूह आणि बाजारपेठा: आघाडीच्या कोरियन शिपिंग कंपनीने भारतीय ध्वजांकित, मेड इन इंडिया कंटेनर्स आणि आगामी वाढवण बंदरामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे विविध शक्यतांचा शोध घेण्यात आला.

सोनोवाल यांनी कोरियन सागरी वित्तपुरवठा संस्था आणि भारतीय भागधारकांमध्ये अधिक सहकार्यासाठी आवाहन केले. भारताने सुमारे 7.8 अब्ज डॉलर्सच्या जहाजबांधणी सहाय्य पॅकेजला मंजुरी दिली आहे, मोठे जहाजबांधणी समूह विकासाधीन आहेत आणि 400 हून अधिक जहाजांची निर्मिती प्रक्रिया सुरु  आहे, जिचे अंदाजित मूल्य 23 अब्ज डॉलर्स आहे.

या बैठकांमुळे जागतिक सागरी क्षेत्रातील कंपन्यांसोबत सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले झाले, ज्यामुळे 2047 पर्यंत जहाजबांधणी, जहाजवाहतूक आणि सागरी सेवांसाठी जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या ध्येयाला पाठबळ मिळाले.

सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329253) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English