Posted On:
27 OCT 2026 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 27 ऑक्टोबर 2026
दक्षता जागरूकता सप्ताह 2026 च्या निमित्ताने दूरसंचार विभाग (डीओटी), मुंबई परवानाधारक सेवा क्षेत्र (एलएसए) यांनी इमानदारी, पर्यावरणीय शाश्वतता, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले.
डीओटी मुंबई एलएसएद्वारे हाती घेण्यात आलेले उपक्रम:
1. सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:00 डीओटी मुंबई एलएसएच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा देण्यात आली. मुंबई एलएसएच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञेत सहभाग घेतला आणि आपली कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना सचोटी, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक आचरण जपण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

2. वृक्षारोपण उपक्रम
मुंबईतील सांताक्रूझ, जुहू तारा रोड येथील बीएसएनएल (BSNL) संकुलात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुंबई एलएसए येथील अतिरिक्त दूरसंचार महासंचालक यांच्याद्वारे वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. याद्वारे पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाप्रति सामूहिक जबाबदारीचा संदेशही देण्यात आला.

3. सातवी फिट इंडिया फ्रीडम रन 2026
डीओटी मुंबई एलएसए ने मुंबईतील जुहू बीचवर 7 व्या फिट इंडिया फ्रीडम रन 2026 चे आयोजन केले. या कार्यक्रमातून अधिक तंदुरुस्त, अधिक निरोगी आणि अधिक सशक्त भारत घडवण्याबाबत सहभागींची सामूहिक वचनबद्धता प्रतिबिंबित झाली. या उपक्रमाने शारीरिक तंदुरुस्ती, सक्रिय जीवनशैली आणि आरोग्य आणि कल्याणाच्या महत्त्वाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचे प्रोत्साहन दिले. या उपक्रमांच्या माध्यमातून, डीओटी मुंबई एलएसएने सार्वजनिक सेवेमध्ये सचोटी आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्याबाबत, पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत आणि निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या उपक्रमांनी राष्ट्र उभारणीत तसेच जबाबदार, पारदर्शक आणि निरोगी समाजाच्या निर्मितीमधील वैयक्तिक आणि सामूहिक सहभागाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले.

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai