ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अन्न महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबईद्वारे विशेष मोहीम 6 ची अंमलबजावणी

Posted On: 27 OCT 2026 4:36PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑक्टोबर 2026

भारतीय अन्न महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई, 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम 6 सक्रियपणे राबवत आहे. या मोहिमेचा मुख्य भर स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन सुलभ करणे, प्रलंबित कामे कमी करणे आणि कार्यालयीन जागेचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यावर आहे.

मोहिमेच्या पहिल्या तीन आठवड्यांत, कार्यालयाने 1,091 प्रत्यक्ष कागदी फाइल्सचे परिक्षण केले असून त्यापैकी 83 फाइल्स काढून टाकल्या आहेत. डिजिटल क्षेत्रात, 780 ई-फाइल्सचेही परिक्षण करण्यात आले असून 66 ई-फाइल्स बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, या उपक्रमाचा भाग म्हणून चार स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.

 

 

ही मोहीम स्वच्छता, कार्यक्षम अभिलेख व्यवस्थापन, प्रलंबित कामांचे निराकरण आणि कार्यालयीन जागेचा प्रभावी वापर यांसारख्या बाबींवर सरकारचा असलेला निरंतर भर दाखवत आहे. याद्वारे अधिक कार्यक्षम आणि उत्तरदायी सार्वजनिक प्रशासनाला चालना मिळते.

या मोहिमेत सर्वसमावेशक अभिलेख व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे; ज्यामध्ये फाइल्सचे परिक्षण करणे, अनावश्यक दस्तऐवज काढून टाकणे आणि प्रलंबित ई-फाइल्स बंद करणे यांचा समावेश आहे. तसेच, कचरा व्यवस्थापन, ई-कचरा, कालबाह्य वस्तू आणि इतर भंगार साहित्यासारख्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

भारतीय अन्न महामंडळ, क्षेत्रीय कार्यालय (पश्चिम), मुंबई आणि त्यांची अधीनस्थ कार्यालये, निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये दिसून येईल असा परिणाम घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.


पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328985) अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein: English