Posted On:
26 OCT 2026 7:39PM by PIB Mumbai
पणजी, 26 ऑक्टोबर 2026
टपाल विभागातर्फे 4 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी येथील वरिष्ठ टपाल अधीक्षक कार्यालय, गोवा विभाग येथे विभागीय स्तरावरील पेन्शन अदालत सकाळी 11 वाजता, तर टपाल अदालत दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
या अदालतींचा उद्देश पेन्शनधारक आणि नागरिकांच्या टपाल सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निवारण करणे हा आहे. मूळ अर्ज सादर केल्यापासून सहा आठवड्यांच्या आत ज्या तक्रारींवर उत्तर मिळालेले नाही, अशाच तक्रारी या अदालतींमध्ये स्वीकारल्या जातील.
अर्जादारांनी आपले निवेदन संबंधित उपयुक्त कागदपत्रांसह 2 नोव्हेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक अर्जात फक्त एकाच विशिष्ट तक्रारीचा समावेश असावा.
मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याला संबोधित केली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पदनाम अर्जात स्पष्टपणे नमूद केलेले असावे. अर्ज प्रत्यक्ष भेटून दिले जाऊ शकतात किंवा 'वरिष्ठ टपाल अधीक्षक कार्यालय, गोवा विभाग, ईडीसी, पाटो, पणजी - 403001' या पत्यावर टपालद्वारे पाठवले जाऊ शकतात.
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai