Posted On:
23 OCT 2026 5:12PM by PIB Mumbai
नागपूर, 23 ऑक्टोबर 2026
नागपूर इथल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमीने(एनडीआरएफ), 22 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या सुरादेवी परिसरात 500 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. अक्षय ऊर्जा आणि शाश्वत परिसर कार्यान्वयनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या पुढाकारातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढावा, या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनानुरूप हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी एनडीआरएफ नागपूरचे,कमांडंट(वर्क्स) बी.एस राजपूत होते. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूरशी संलग्न अधिकारी आणि अकादमीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून संस्थेच्या परिसराच्या वीजविषयक गरजा पूर्ण करण्यात, ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यात आणि पारंपरिक ग्रीड विजेवरचे अवलंबित्व कमी करण्यात हा 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प लक्षणीय योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जा अवलंबण्यास चालना देण्यासाठी एनडीआरएफ अकादमी, अंमलबजावणी संस्था आणि वीज वितरण प्राधिकरण यांचे समन्वित प्रयत्न प्रतिबिंबित होतात. पर्यावरण संरक्षण आणि अक्षय ऊर्जेला चालना देण्याच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना सुसंगत, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत परिसर विकसित करण्याच्या अकादमीच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

_20261023162658_dc00b6.jpeg)

* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai