Posted On:
19 OCT 2026 7:45PM by PIB Mumbai
मुंबई, 19 ऑक्टोबर 2026
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एन आय ओ एस) तर्फे वर्षातून दोन वेळा सार्वजनिक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा एप्रिल–मे आणि ऑक्टोबर–नोव्हेंबर या महिन्यांत होतात. परीक्षांच्या तारखा एन आय ओ एस मुख्यालयाकडून निश्चित केल्या जातात. ऑक्टोबर 2026 मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांच्या एन आय ओ एस सार्वजनिक परीक्षा (लेखी) 22 ऑक्टोबर 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर आयोजित केल्या जाणार आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक एन आय ओ एस च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://sdmis.nios.ac.in/registration/home-notifications
लेखी परीक्षेची हॉल तिकीट एन आय ओ एस च्या संकेतस्थळावर आधीच अपलोड केली आहेत. विद्यार्थी खालील लिंकवरून त्यांच्या लेखी परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात: https://sdmis.nios.ac.in/search/hall-ticket
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai