ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘बीआयएस’च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाने मुंबईत 'मानक महोत्सवा'द्वारे 'परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा' या विषयावर 'जागतिक मानक दिन 2026’ केला साजरा

Posted On: 15 OCT 2026 9:48PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑक्टोबर 2026

‘बीआयएस’ म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाने यांनी मुंबईत पूर्व अंधेरीतील 'सीप्झ एमआयडीसी' परिसरातील 'भारत रत्नम मेगा कॉमन फॅसिलिटी सेंटर' (सीएफसी) येथे 'मानक महोत्सवा'च्या माध्यमातून 'जागतिक मानक दिन 2026' साजरा केला. हा कार्यक्रम 'शाश्वत विकास ध्येय 7' (एसडीजी 7) - 'परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा' या विषयावर केंद्रित होता. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमता, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, औद्योगिक शाश्वतता आणि सुरक्षित विश्वासार्ह ऊर्जा पर्यायांच्या उपलब्धतेसाठी भारतीय मानकांची  महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ,उद्योग प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ आणि ‘बीएसआय’ चे अधिकारी सहभागी झाले. त्यांनी शाश्वत विकासासाठी मानकीकरणाचे  योगदान आणि भारताचे स्वच्छ ऊर्जा प्रणालींकडे होणारे संक्रमण यावर सविस्तर चर्चा केली.

मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (आयसीटी), पूर्वीचे 'युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (यूडीसीटी ) म्हणून ओळखले जाते,  त्या संस्थेचे  माजी संचालक, पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून उपस्थित  होते.  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.  त्यानंतर, ‘बीआयएस’ च्या मुंबई शाखा कार्यालयाचे प्रमुख आणि 'वैज्ञानिक-एफ'  राजीव रंजन सिंग यांनी स्वागतपर भाषण केले. ‘बीआयएस’ चे उपमहासंचालक (पश्चिम) सुभादीप बसू यांनी उद्घाटनपर भाषण करताना गुणवत्ता, नाविन्य आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मानकांचे महत्त्व स्पष्ट केले. ‘बीआयएस’ च्या पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेचे प्रमुख आणि 'वैज्ञानिक-ई' डॉ. अनिल कापरी यांनी 'जागतिक मानक दिन'निमित्त संदेश वाचून दाखवला.

कार्यक्रमाचे अतिथी, 'स्टॅटकॉन एनर्जिया' चे संचालक प्रांजल पांडे आणि 'टाटा स्टील'चे मुख्य  शशी भूषण यांनी शाश्वत औद्योगिक पद्धतींना आणि स्वच्छ ऊर्जा पर्यायांच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी गुणवत्ता, मानकीकरण आणि तांत्रिक नाविन्य यांचे महत्त्व यावर आपली मते मांडली. प्रमुख पाहुणे प्रा. एम. एम. शर्मा यांनी उदयोन्मुख औद्योगिक आणि शाश्वततेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक नवोपक्रम आणि गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनांच्या महत्त्वावर भर दिला. या सत्रात शाश्वत औद्योगिक वाढ आणि ऊर्जा-कार्यक्षम आणि  पर्यावरणास जबाबदार तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी वैज्ञानिक ज्ञान आणि मानकीकरणाचा उपयोग करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला.

गुणवत्ता पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि ‘बीआयएस’ उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अखिल भारतीय प्रथम परवाना प्राप्तकर्ते, उत्कृष्ट कामगिरी करणारी मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रे, प्रयोगशाळा आणि इतर हितधारकांना सन्मानित करण्यासाठी एका सत्कार समारंभाचे आयोजन यावेळी  करण्यात आले होते.

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2324165) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English