नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाजगी 5जी सीएनपीएन परवाना मिळवणारे मुरगाव बंदर ठरले, भारतातील पहिली सरकारी स्वायत्त संस्था


सप्टेंबर 2026 मध्ये मान्यता प्राप्त; स्मार्ट बंदर कार्यान्वयन, कार्गो ट्रॅकिंग आणि डिजिटल परिवर्तनाला चालना देणारा उपक्रम

Posted On: 15 OCT 2026 5:48PM by PIB Mumbai

पणजी, 15 ऑक्टोबर 2026

गोव्यातील मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) ही खाजगी 5जी नेटवर्कसाठी कॅप्टिव्ह नॉन-पब्लिक नेटवर्क (सीएनपीएन) अर्थात खाजगी मर्यादित वापराच्या दूरसंचार नेटवर्कची अधिकृतता मिळवली असून अशी परवानगी मिळवणारे ते भारतातील पहिली सरकारी स्वायत्त प्राधिकरण आणि पहिले प्रमुख बंदर ठरले आहे. सप्टेंबर 2026 मध्ये मिळालेली ही मान्यता, बंदराच्या कामकाजात अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा उपक्रम सागरी क्षेत्रातील डिजिटायझेशन, कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. प्रस्तावित खाजगी 5जी नेटवर्कमुळे तंत्रज्ञान-आधारित बंदर संचालनाला मदत होईल आणि मुरगाव बंदरातील डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी बंदर प्राधिकरणाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता एका सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. बंदर प्राधिकरणाने योग्य प्रणाली एकत्रीकरण संस्था आणि मूळ उपकरण उत्पादकांची निवड करण्यासाठी माहिती मागवणारी विनंती देखील जारी केली आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रायोगिक चाचण्या घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

प्रस्तावित नेटवर्कमुळे बंदर परिसरात उच्च-गतीची इंटरनेट जोडणी, जलद आणि विश्वसनीय दळणवळण सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. हे खाजगी नेटवर्क, बंदराच्या औद्योगिक वातावरणातील गरजा पूर्ण करू शकेल, तसेच नेटवर्क व्यवस्थापन आणि कार्यात्मक डेटा हाताळणीवर अधिक नियंत्रण ठेवण्यास सक्षम करेल.

स्मार्ट बंदर संचालन, स्वयंचलित लॉजिस्टिक्स आणि कार्गो ट्रॅकिंग यांसारख्या प्रमुख कार्यात्मक क्षेत्रांमध्ये खाजगी 5जी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यता तपासण्यासाठी बंदर प्राधिकरण (MPA) एक अंमलबजावणी योजना तयार करत आहे. संभाव्य उपयोगांमध्ये रिअल-टाइम मॉनिटरिंग, ड्रोन-आधारित निगराणी, स्मार्ट सेन्सर्स आणि बंदराच्या पायाभूत सुविधांचे तंत्रज्ञान-सक्षम व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

या तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे कामकाजावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे तसेच अधिक कार्यक्षम मालवाहतूक आणि बंदरातील कामांमध्ये उत्तम समन्वय साधण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. प्रस्तावित नेटवर्कमुळे सागरी कामकाजाचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी परस्परांशी जोडलेली उपकरणे आणि डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण करणेही सुलभ होऊ शकते.

हा उपक्रम प्रगत दळणवळण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बंदराच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा प्रकल्प नियोजन आणि चाचणीच्या टप्प्यांतून जसजसा पुढे जाईल, तसा तो आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आपली डिजिटल क्षमता मजबूत करण्यासाठी खाजगी 5-जी नेटवर्कचा शोध घेत असलेल्या इतर प्रमुख बंदरांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकेल

या उपक्रमाद्वारे मुरगाव बंदर प्राधिकरणाचे उद्दिष्ट सागरी लॉजिस्टिक्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि भारताच्या बंदर क्षेत्रातील व्यापक डिजिटल परिवर्तनाला हातभार लावणे, हे आहे.

 
पीआयबी मुंबई |राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2324018) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English