दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर बीएसएनएल आणि दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून दूरसंचार आणि प्रसारण तक्रार निवारणावर ग्राहक शिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 15 OCT 2026 11:45AM by PIB Mumbai

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), नागपूर, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) समन्वयाने गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:00 वाजता 2026–27 या वर्षासाठी “दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील ग्राहक तक्रार निवारण” या विषयावर ग्राहक शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील तक्रार निवारण यंत्रणेबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. तक्रारींची नोंद करणे, तक्रारींचे निवारण मिळवणे आणि ग्राहकांच्या समस्या सोडवण्याच्या पद्धती समजून घेणे या उपलब्ध मार्गांची सहभागींना सविस्तर माहिती दिली जाईल.

ही कार्यशाळा कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, मुख्य महाव्यवस्थापक (PGM) यांचे कार्यालय, दूरसंचार भवन, झिरो माईल, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 येथे आयोजित केली जाईल.

कार्यशाळेतील सहभाग पूर्णपणे मोफत असून तो सर्व ग्राहकांसाठी खुला आहे. तथापि, जागा मर्यादित असून त्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर दिल्या जातील. ग्राहकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून दूरसंचार व प्रसारण क्षेत्राशी संबंधित आपले ग्राहक अधिकार आणि तक्रार निवारण प्रक्रियांची समज अधिक दृढ करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हा उपक्रम पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच ग्राहकांना त्यांच्या समस्यांचे वेळेवर निवारण करून घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी ग्राहक शिक्षण आणि जागरूकतेचे महत्त्व दर्शवत आहे. 

 

***

NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2323716) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English