परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा स्वप्नांना बळ: पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अवघ्या 24 तासांत पासपोर्ट जारी करून विद्यार्थ्यांच्या नासा (NASA) आणि ईएसए शैक्षणिक दौऱ्याला दिली गती

Posted On: 15 OCT 2026 10:58AM by PIB Mumbai

विद्यार्थी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहभाग कार्यक्रम' (SAMEEP) अंतर्गत, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO), पुणे येथे 14 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील नासा (NASA) आणि ईएसए (ESA) शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांसोबत 'संवाद' या एकमेकांसोबत खुलेपणाने चर्चा करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या संवादादरम्यान, पुणे विभागाचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी पासपोर्ट सेवांबद्दल चर्चा केली आणि आंतरराष्ट्रीय प्रवास व नवीन संधी प्राप्त करण्यासाठी पासपोर्टचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) त्यांचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील ज्ञानाच्या आधारे, त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक संधी, आंतरसांस्कृतिक शिक्षण आणि स्वतःच्या दृष्टिकोनाचा विस्तार करण्याचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुण्याच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या 'संवाद' कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि शिक्षकांसह एकूण 52 विद्यार्थी उपस्थित होते.

पारदर्शक आणि कार्यक्षम पासपोर्ट सेवा देण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवत, पुण्याच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक दौऱ्याला पाठबळ देण्यासाठी पासपोर्ट वाटप प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आणि अवघ्या 24 तासांच्या आत त्यांचे पासपोर्ट जारी केले.

आरपीओ पुणेने विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या या समृद्ध करणाऱ्या व संस्मरणीय अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून पुण्याच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या नागरिक-केंद्री सेवा वितरणातील वचनबद्धतेचे आणि कार्यालयाने अतिशय कमी वयाच्या या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी प्राप्त करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाचे दर्शन घडले.

***

NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2323682) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English