संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने 'संयुक्त कार्यदल 154' ने पहिली ‘कमांड’ केली यशस्वी पूर्ण
Posted On:
14 OCT 2026 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026
भारतीय नौदलाने 14 ऑक्टोबर 2026 रोजी बहरीनच्या मनामा येथे आयोजित एका समारंभात संयुक्त कार्यदल 154 ची पहिली कमांड यशस्वीरित्या पूर्ण केली. हा आठ महिन्यांचा कार्यकाळ बहुराष्ट्रीय सागरी प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि सहयोगी सागरी सुरक्षेमध्ये भारताच्या वाढत्या योगदानातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
या समारंभाला संयुक्त सागरी दलांचे कमांडर व्हाईस ॲडमिरल कर्ट ए. रेनशॉ; बहरीनमधील भारताचे राजदूत डॉ. प्रदीप सिंग राजपुरोहित; रॉयल बहरीन नौदल दलाचे नौदल क्षेत्र कमांडर कमोडोर खालिद जासिम अल्थावादी, संयुक्त सागरी दलांचे उपकमांडर कमोडोर डॅन थॉमस, तसेच सीएमएफ मुख्यालय आणि भागीदार राष्ट्रांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय नौदलाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी सीटीएफ 154 ची कमांड स्वीकारली आणि सीएमएफ कार्यदलाचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय नौदल तुकडी ठरली.
आपल्या कार्यकाळात, भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखालील सीटीएफ 154 ने 20 ‘स्टाफ एन्हांसमेंट ट्रेनिंग’ कार्यक्रम, दोन प्रमुख बहुराष्ट्रीय प्रशिक्षण सराव आणि चाचेगिरी आणि सशस्त्र दरोडा या विषयावर तज्ज्ञांचा आदान-प्रदान कार्यक्रम (एसपीएआर 2026) आयोजित केले. या उपक्रमांमधून एकत्रितपणे 7,800 तासांहून अधिक काळ प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये 39 देशांतील जवानांनी सीटीएफ 154 च्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. केवळ ‘स्टाफ एन्हांसमेंट ट्रेनिंग’ आणि स्पार कार्यक्रमांमध्येच 1,100 हून अधिक सहभागींची उपस्थिती नोंदवली गेली, जी या कमांडच्या काळात हाती घेतलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची व्याप्ती आणि स्थान दर्शवते.
समारोपाचा प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम स्पार 2026 हा होता, जो 05 आणि 06 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. भारत 2022 मध्ये संयुक्त सागरी दलांमध्ये सहयोगी भागीदार म्हणून सामील झाला आणि 2023 मध्ये पूर्ण सदस्य बनला. सीटीएफ 154 च्या पहिल्या यशस्वी आयोजनाने बहुराष्ट्रीय सागरी भागीदारीतील भारताच्या सहभागात एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविली आहे. या कार्यकाळात, सामायिक सागरी सुरक्षा उद्दिष्टांच्या समर्थनार्थ विविध राष्ट्रे, संस्था आणि कार्यात्मक कौशल्ये एकत्र आणून, बहुराष्ट्रीय प्रशिक्षण उपक्रमांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्याची भारतीय नौदलाची क्षमता दिसून आली.
(9)_20261014204236_976b9d.jpeg)
(10)_20261014204157_66f90d.jpeg)
(10)_20261014204207_5461b0.jpeg)
(6)_20261014204218_9d07bb.jpeg)
सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323623)
अभ्यागत कक्ष : 6