सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून दीव येथे पश्चिम विभागीय क्षेत्रीय एकदिवसीय आढावा बैठकीचे आयोजन
गोवा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र सरकार आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या वरिष्ठ प्रतिनिधींसह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती
शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे, एकालाही मागे न ठेवता सर्व लाभार्थ्यांना लाभ देणे आणि परिणाम-केंद्रित अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांनी प्रमुख कल्याणकारी, सामाजिक सक्षमीकरण आणि सामाजिक संरक्षण योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
Posted On:
09 OCT 2026 10:08PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशाच्या पश्चिम विभागातील प्रमुख कल्याणकारी, सामाजिक सक्षमीकरण आणि सामाजिक संरक्षण योजनांच्या अंमलबजावणीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी आज दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील दीव येथे एक दिवसीय प्रादेशिक आढावा बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीत राजस्थान, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि प्रादेशिक आढावा बैठकीच्या अंमलबजावणीचे प्रमुख प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे अधोरेखित केली.
केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रादेशिक आढावा बैठकीत भाग घेतला.
समाजकल्याण विभागाचे सचिव आशिष मोहन, दीवचे जिल्हाधिकारी राहुल देव बोरा आणि, समाजकल्याण विभागाचे संचालकआणि उपसचिव पुनीत कुलश्रेष्ठ यांच्यासह केंद्रशासित प्रदेशातील इतर वरिष्ठ अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
सहभागी राज्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला. चर्चेत राजस्थान सरकारच्या समाजकल्याण विभागाचे संचालक ललित कुमार; गोवा सरकारच्या समाजकल्याण विभागाचे संचालक दीपक देसाई; महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आणि महाराष्ट्र सरकारच्या संचालिका सोनाली मुळे चर्चेत सहभागी झाले होते.
गुजरात शासनाकडून इतर मागासवर्गीय विभागाचे सहसंचालक डॉ. जगदीश वधवाना; सामाजिक संरक्षण विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रार्थना शेराशिया; अनुसूचित जाती कल्याण विभागाचे उपसंचालक हिरेन एल चौधरी; ओबीसी विभागाचे समाज कल्याण अधिकारी दीपक चावडा हे देखील दिवसभर चाललेल्या बैठकीला उपस्थित होते.
***
Neha Kulkarni / Sonali Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321619)
अभ्यागत कक्ष : 13