नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुरगाव बंदर प्राधिकरण आणि स्टेला मेरीज् अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात उद्योग-शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार

Posted On: 09 OCT 2026 6:26PM by PIB Mumbai

उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने  मुरगाव बंदर प्राधिकरण आणि तामिळनाडूमधल्या स्टेला मेरीज् अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात 7 ऑक्टोबर रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्राचार्य डॉ. सुरेश प्रेमिल कुमार आर. यांनी केले.  त्यांच्यासोबत माहिती विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि  पदव्युत्तर समन्वयक डॉ. सगाई फ्रान्सिस ब्रिटो आणि अधिष्ठाता व व्यवस्थापन प्रतिनिधी अरोकिया लता या देखील उपस्थित होत्या.

या बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने महाविद्यालातील शैक्षणिक उपक्रम, संशोधन क्षमता आणि सल्लागार सेवा क्षेत्रातील सादरीकरण केले आणि मुरगाव बंदराच्या कार्यात्मक आणि धोरणात्मक गरजांशी संबंधित विविध क्षेत्रांवर प्रकाश टाकला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुरगाव बंदर प्राधिकरणाने शैक्षणिक संस्थेसोबत पहिल्या सहयोगात्मक उपक्रमाची पायाभरणी केली  आणि भविष्यात बंदर प्राधिकरण व शैक्षणिक संस्था यांच्यातील ज्ञान भागीदारी, शैक्षणिक उपक्रम तसेच सहकार्यासाठी नवीन मार्ग खुला झाला. 

मुरगाव बंदर प्राधिकरणाविषयी: गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीवर झुआरी नदीच्या मुखाशी स्थित असलेले मुरगाव बंदर हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. या बंदराची स्थापना 1888 मध्ये झाली. या बंदरातून लोहखनिज, कोळसा, द्रवरूप माल आणि सामान्य माल यांसह विविध प्रकारच्या मालाची हाताळणी केली जाते.

***

Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321563) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English