दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पणजी येथे 16 ऑक्टोबर रोजी टपाल निवृत्तीवेतन (पेन्शन)अदालतीचे आयोजन

Posted On: 07 OCT 2026 6:22PM by PIB Mumbai

पणजी, 6 ऑक्टोबर 2026

टपाल विभागातील निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गोवा टपाल विभागातर्फे 16 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्टर जनरल (गोवा विभाग) यांच्या कार्यालयात 'टपाल निवृत्तीवेतन अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे.

गोवा टपाल विभागामध्ये गोवा राज्य तसेच महाराष्ट्रातील  सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो.

टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक, तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या  निवृत्तीवेतन आणि त्याच्या आनुषंगिक लाभांशी संबंधित तक्रारी या अदालतीत दाखल करू शकतात. टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाईल.

मात्र,  केवळ वारसाहक्काशी संबंधित वाद आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

निवृत्तीवेतनधारक त्यांचे अर्ज विहित नमुन्यात **श्री महेश एन., वरिष्ठ लेखा अधिकारी आणि सचिव, निवृत्तीवेतन अदालत, कार्यालय पोस्टमास्तर जनरल, गोवा विभाग, पणजी – 403001 यांच्याकडे सादर करू शकतात. अर्ज accts.goa@indiapost.gov.in या ईमेल पत्त्यावरही पाठवता येतील.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2026 आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज, प्रस्तावित निवृत्तीवेतन अदालतीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.


पीआयबी मुंबई |सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2320305) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English