गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा एनसीबीकडून म्हापसा येथून संशयित अमलीपदार्थ जप्त, तिघांना अटक

Posted On: 03 OCT 2026 11:57AM by PIB Mumbai

 

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) गोवा क्षेत्रिय कार्यालयाने शोध व जप्ती मोहीमेदरम्यान तीन जणांना अटक केली आहे. या तिघांकडून चरस, एमडीएमए/एक्स्टासी, कोकेन, गांजा व मेथाम्फेटामाइन यासह विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

एनसीबी गोवा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये 29 सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये म्हापसा, बारदेज येथील घरांमधून, तसेच पाठलाग करत रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडून संशयित अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

म्हापसा येथील घरांधल्या जप्तीदरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी 6.659 ग्राम एमडीएमए/इक्स्टासी, 40.587 ग्राम कोकेन, 3.082 ग्राम मेथाम्फेटामाइन, 2.53 ग्राम गांजा आणि 30.841 ग्राम चरस हे संशयित अमली पदार्थ ताब्यात घेतले.

या प्रकरणाशी संबंधित कारवाईमध्ये एनसीबी अधिकाऱ्यांनी थिविम रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना अडवले. त्यांच्याकडून चरस असल्याच्या संशयावरुन 87 ग्राम वजनाचा तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ जप्त करण्यात आला.

याचा तपास करत एनसीबी पथक कोलवळे येथे पोहोचले. तिथे त्यांनी अन्य एका व्यक्तीकडून असाच चरस असल्याचा संशय असलेला 2.35 ग्राम वजनाचा तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ जप्त केला.

या कारवाईदरम्यान तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अमली पदार्थांची आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची अवैध तस्करी व वितरण याविरोधातील शोध मोहीम व जप्तीची कारवाई यापुढेही सुरू राहील, असे एनसीबी गोवा क्षेत्रिय कार्यालयाने सांगितले.

अमली पदार्थ अथवा सायकोट्रॉपिक पदार्थ यांची विक्री किंवा तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती असेल तर नागरिकांनी मानस या राष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी मदतकक्षाशी 1933 या विनाशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एनसीबीने केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय राखली जाईल.  

***

शिल्पा पोफळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2318621) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English