आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफएसएसएआय आणि बीएमसीकडून मुंबईतील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 57वे अन्न सुरक्षा प्रशिक्षण सत्र


वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, दूषितता प्रतिबंध आणि स्वच्छ पद्धतीने अन्न साठवणुकीबाबत प्रशिक्षण

Posted On: 01 OCT 2026 6:13PM by PIB Mumbai

मुंबई, 1 ऑक्‍टोबर 2026

 

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या पद्धती अधिक रुजवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहकार्याने 30 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईतील अंधेरी येथे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 57वे अन्न सुरक्षा प्रशिक्षण सत्र आयोजित केले.

या प्रशिक्षण सत्राला रस्त्यावरील  सुमारे 50 खाद्यपदार्थ विक्रेते उपस्थित होते. वैयक्तिक स्वच्छता, अन्नाची सुरक्षित हाताळणी, अन्न दूषित होण्यास प्रतिबंध, अन्न तयार करण्याच्या ठिकाणांची स्वच्छता तसेच स्वच्छ पद्धतीने अन्नाची साठवणूक आणि सेवा देणे यांसह अन्न सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर या सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

एफएसएसएआय आणि बीएमसी यांच्यातील सामरिक सामंजस्य कराराअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या करारानुसार मुंबईतील रस्त्यावरील 10,000 हून अधिक  खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियोजित अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे.

रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्तरावर अन्न सुरक्षा पद्धती अधिक बळकट करणे आणि विक्रेत्यांमध्ये अधिक सुरक्षित व स्वच्छ अन्न पद्धतींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे ‘ईट राइट इंडिया’ अभियानाच्या उद्दिष्टांना हातभार लागणार आहे.

मुंबईतील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या आवश्यकतांचे अनुपालन अधिक बळकट करण्यासाठी एफएसएसएआय आणि बीएमसीकडून अशा क्षमता बांधणी आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन यापुढेही सुरू ठेवण्यात येईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317825) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English