दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर विभागाचे पोस्टमास्टर जनरल 7 ऑक्टोबर रोजी डाक अदालतीचे करणार आयोजन

Posted On: 29 SEP 2026 5:30PM by PIB Mumbai

नागपूर, 29 सप्‍टेंबर 2026

 

नागपूर विभागाचे पोस्टमास्टर जनरल 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता, नागपूर येथील शंकर नगर पोस्ट ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पोस्टमास्टर जनरल, नागपूर विभाग यांच्या कार्यालयात, दुसरी मासिक डाक अदालत आयोजित करणार आहेत.

या डाक अदालतीद्वारे विदर्भ प्रांतातील टपाल सेवेशी संबंधित प्रलंबित तक्रारी मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डरची रक्कम पोहोचती न होणे यांसारख्या टपाल सेवांशी संबंधित तक्रारी या अदालतीत विचारात घेतल्या जातील. तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिलेल्या तक्रारी अदालतीत मांडता येतील.

इच्छुक ग्राहकांनी आपल्या तक्रारी – जयंत एस. दाओ, सहायक संचालक (टपाल सेवा)-2 तथा सचिव, डाक अदालत, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, नागपूर विभाग, पहिला मजला, शंकर नगर पोस्ट ऑफिस इमारत, नागपूर– 440010, येथे 2 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी दोन प्रतींमध्ये सादर कराव्यात. तक्रारीमध्ये मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, त्यांचे नाव आणि पदनाम तसेच संबंधित टपाल वस्तूची आवश्यक माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

ग्राहकांना त्यांच्या तक्रारी थेट मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तक्रारींच्या लवकरात लवकर निराकरणास मदत करणे, हा या डाक अदालतीचा उद्देश आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316565) अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein: English