कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. अंजनी कुमार यांनी सांभाळला वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या तांत्रिक संचालक (प्रकल्प आणि नियोजन) पदाचा कार्यभार

Posted On: 29 SEP 2026 5:24PM by PIB Mumbai

नागपूर, 29 सप्‍टेंबर 2026

 

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने 28 सप्टेंबर 2026 रोजी डॉ. अंजनी कुमार यांचे संचालक (तांत्रिक – प्रकल्प आणि नियोजन) म्हणून स्वागत केले. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे, संचालक (वित्त) बिक्रम घोष आणि संचालक (तांत्रिक)  संदीप परांजपे यांनी डॉ. कुमार यांचे स्वागत केले आणि त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये रुजू होण्यापूर्वी, ते ऑक्टोबर 2025 पासून कोल इंडिया लिमिटेड मुख्यालय, कोलकाता येथे कार्यकारी संचालक (कंत्राट) म्हणून कार्यरत होते.

डॉ. कुमार यांना कोल इंडिया लिमिटेड मधील तब्बल 33 वर्षांचा अनुभव असून खनिकर्म संबंधित कार्यप्रणाली, प्रकल्प नियोजन, दक्षता, कंत्राट व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमधील विशेष प्रावीण्य आहे. त्यांनी आयआयटी (आयएसएम), धनबाद येथून खाण अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. आणि पर्यावरण विज्ञानात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे; तसेच त्यांनी डीजीएमएसचे 'फर्स्ट क्लास माइन्स मॅनेजर्स सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी'  प्रमाणपत्र देखील प्राप्त केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन  विषयात एमबीए आणि प्रकल्प व्यवस्थापनात एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा पूर्ण केला आहे.

डॉ. कुमार यांनी 1993 मध्ये कोल इंडिया लिमिटेड मधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) मध्ये व्यवस्थापकीय संचालकांचे तांत्रिक सचिव यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी महानदी कोलफिल्डस लिमिटेड मध्ये प्रकल्प आणि नियोजन विभाग प्रमुख म्हणूनही कार्य केले आहे.

खाणकाम क्षेत्रातील तांत्रिक, कार्यान्वयन आणि व्यवस्थापकीय अनुभवाने संपन्न असलेल्या डॉ. कुमार यांच्यामुळे वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडला अधिक बहुमोल कौशल्य प्राप्त होईल. प्रकल्प नियोजन आणि खाणकाम कार्यान्वयन या क्षेत्रातील त्यांच्या नैपुण्यामुळे कार्यक्षम आणि शाश्वत विकासाच्या कंपनीच्या प्रयत्नांना हातभार लागेल.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316560) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English